नागपूर :- इंदिरा गांधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात हज यात्रेकरूसाठी लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 24 मे ते 31 मे 2023 पर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत (पहिला माळा) बाहयरूग्ण विभाग कक्ष क्रमांक 38 येथे सकाळी 12 ते दुपारी 1 पर्यंत लसीकरण करण्यात येईल. या लसीकरणाचा लाभ जास्तीत जास्त यात्रेकरूंनी घ्यावा, असे आवाहन इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.