मनपा प्रशासक तथा आयुक्त राजेश मोहिते यांचे आवाहन
चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्फतीने चंद्रपूर शहरातील 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असून, संभाव्य चौथी लाट थोपवून धरण्यासाठी लस घेण्याचे आवाहन मनपा प्रशासक तथा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्फतीने चंद्रपूर शहरातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 2, रामनगर येथे 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे कोर्बेव्हॅक्स लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येत आहे. विविध शाळा महाविद्यालयांमध्येही लस देण्यात येणार असल्याने पालकांनी शाळेत संपर्क साधावा. १५-१७ वर्ष वयोगटातील मुलांना शहरातील मनपाच्या सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी लस घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.