कोदामेंढी :- मागील सहा महिन्यांपासून शंभर करोडच्या वर खर्चाचे कन्हान ते अरोली नविन सिमेंट रस्ता बांधकाम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. नविन सिमेंट रस्ता मजबूत व दीर्घ काळ टिकाऊ राहण्यासाठी रस्त्याच्या पाया (बेस) मजबूत असने आवश्यक आहे. परंतु हर्ष कंस्टृक्शन कंपनी कडून कुठे कुठे रस्त्याच्या खोदकामाचा निकृष्ठ दर्जाचा डांबराच्या ढेरेचा, माती मिश्रित मुरमाचा वापर रस्ता बांधकामात होताना दिसत आहे. तसेच रोडरोलरने मळणी करण्यापूर्वी मुबलक प्रमाणात पाण्याचा वापर करण्यात येत नसुन संपूर्ण रस्ता बांधकाम मुबलक पाणी टाकून मळणी करून नविन दानेदार मुरूमासह संपूर्ण साहित्य नविन व उत्कृष्ट दर्जाचे वापरून दर्जेदार रस्ता बांधकाम करण्याची मागणी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर रस्त्यावर स्थित असलेल्या नरसाळा गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
याबाबत भ्रमणध्वनीवरून हर्ष कंस्टृक्शन कंपनीचे संयोजक राजेंद्र सैनी यांना विचारपुस केली असता त्यांनी काम उत्कृष्ठ सुरू असल्याचे सांगितले.