संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या कामठी- मौदा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे तसेच या निवडणूक रिंगणात उडी घेणाऱ्या कांग्रेस च्या उमेदवाराचा विचार केला घेतला असता मागील अनेक वर्षांपासून कामठी विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या नागपुर ग्रामीण तालुक्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे नागपुर ग्रामीण तालुक्याच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष दिले नाही ,नागपूर ग्रामीण तालुक्याला कायम सावत्र वागणूक राजकीय पटलावर देण्यात आली.त्यामुळे महाविकास आघाडीतून कांग्रेस चा उमेदवार नागपूर ग्रामीण चा असावा अशी आग्रही भूमिका कांग्रेस चे पदाधिकारी जयंती दळवी सह स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली आहे.
कामठी विधानसभा मतदार संघात नागपूर ग्रामीण मधील 40 टक्के भाग येतो तर याच 40 टक्के भागातील मतदाराचे मतदान मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरले परिणामी विजयाच्या उंबरठ्याबर असलेले कांग्रेस चे उमेदवार सुरेश भोयर यांना शेवटच्या क्षणी 10 हजाराच्या मतांनी पराभव स्वीकारावा लागलो ज्याची खंत अजूनही कांग्रेस समर्थक मतदारात कायम आहे .नागपूर ग्रामीण मध्ये कांग्रेस च्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे जी कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मोलाचे कार्य करते .नागपूर ग्रामीण मधील हुडकेश्वर, पिपळा, बेसा,बेलतरोडी,बहादुरा,नरसाळा यासारख्या क्षेत्रात प्रचंड लोकसंख्या वाढली असून शहरालगतचा भाग असूनही अविकसित आहे त्यामुळे या भागाला नागपूर ग्रामीण चा स्थानिक लोकप्रतिनिधी मिळावा अशी मागणी जोर धरत आहे तशी आग्रही मागणी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नान पटोले यांच्याकडे पण ठेवली आहे.
काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे.तत्पूर्वी राजकीय वर्तुळात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. कधी नव्हे एवढे कामठी -मौदा विधानसभा मतदार संघाचे राजकारण चांगलेच तापलेले आहे.कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार ताकतीने तयारी करताना दिसून येत आहेत.मागील अनेक वर्षांपासून नागपूर ग्रामीण तालुक्याला सापत्न वागणूक मिळत आहे.नागपूर ग्रामीण तालुक्यात कुठल्याही सुविधा नागरिकांना मिळत नाही तसेच नागपूर ग्रामीण तालुक्यातील अनेक महत्वाची विकासकामे प्रलंबित आहेत.