अज्ञात वाहनाच्या धडकेत पायदळी अनोळखी इसमा चा मुत्यु

कन्हान : – पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्रमांक ४४ रोड वर मौजा खंडाळा डुमरी शिवारात एका अज्ञात वाहन चालकाने पायदळी अनोळखी इसमाला धडक मार ल्याने झालेल्या अपघातात एका अनोळखी इसमाचा मृत्यु झाल्याने पारशिवनी पोलीसांनी अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
          पोलीस सुत्रा कडुन मिळालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.३) जानेवारी २०२२ ला सकाळी ६ वाज ता दरम्यान पुर्वी खंडाळा डुमरी शिवारातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्र.४४ रोड वर कोणीतरी अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन मृतक अनोळखी इसम वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष हा रोडवरून पायदळ जात असतांना त्यास धडक मारून पळुन गेल्याने झालेल्या अपघातात अनोळखी इसमा चा मृत्यु झाला. सदर धडकीमुळे अनोळखी पुरुष जागीच मरण पावल्याची फिर्यादी सरकार तर्फे पोलीस हवालदार जयंत शेरेकर यांच्या चौकशी अहवाला वरू न पारशिवनी पोलीसांनी अज्ञात वाहन चालका विरुद्ध अप क्र ०२/२०२२ कलम २७९, ३९४, (अ), भांदवि सहकलम १३४(ए), १८४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोउपनि. श्री विनायक नागुलवार हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकानांवर मनपाची कारवाई

Wed Jan 5 , 2022
नागपूर, ता. ५ : प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.           बुधवारी (ता.५) धरमपेठ झोनच्या उपद्रव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com