विद्यापीठात डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने एकदिवसीय राष्ट्रीय स्तरावरील बहु-विषय परिसंवादाचे 8 मार्च रोजी आयोजन

अमरावती –संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने ‘‘डॉ. आंबेडकरांच्या लोकशाहीची दूरदृष्टी आणि त्याची अंमलबजावणी’’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय स्तरावरील बहु-विषय परिसंवादाचे दि. 8 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता विद्यापीठ अधिसभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिसंवादामध्ये सद्यस्थितीत लोकशाहीच्या चार स्तंभांची भूमिका आणि जबाबदारी, कायद्यातील लोकशाही मूल्यांचे महत्व आणि आजचे वास्तव, लोकशाही कार्यान्वित करण्यात प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता – सरकारद्वारे मूल्ये आणि तत्वे, लोकशाही वाचवण्याचे आणि टिकवण्याचे आव्हान न्यायव्यवस्थेसमोर आहे, नवीन परिस्थितीत लोकांचे मूलभूत अधिकार, धर्मनिरपेक्षतेला धोका आणि आव्हाने, स्वायत्त एजन्सी हाताळणे : लोकशाहीला धोका, अनुसूचित जाती, आदिवासी आणि मागासवर्गीय महिला सक्षमीकरणाची नितांत गरज आहे, डॉ. आंबेडकरांची लोकशाहीची दृष्टी आणि तत्वे आणि विद्यापीठाची कृती, आंबेडकरवादी तत्वज्ञ, विचारवंत, समाजसुधारक यांनी प्रतिबिंबीत केलेली लोकशाही मूल्ये या उप-थीमचा समावेश आहे.

उद्घाटन सत्र  

सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांचे शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर उपस्थित राहतील. बीजभाषण नवी दिल्ली येथील दिल्ली विद्यापीठाचे डॉ. अजितकुमार करतील.

पूर्ण सत्र 1

‘‘डॉ. आंबेडकरांच्या लोकशाहीची दूरदृष्टी आणि त्याची अंमलबजावणी’’ या विषयावर पूर्ण सत्र – 1 संपन्न होणार आहे. सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठ अधिसभा सदस्य तथा शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाडचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई भूषविणार असून रिसोर्स पर्सन्स म्हणून मुंबई विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. संदेश वाघ व डॉ. हरिसिंह गौर केंद्रीय विद्यापीठ, सागरच्या डॉ. प्रिती खंडारे उपस्थित राहतील.

पूर्ण सत्र 2 व तांत्रिक सत्र

‘‘सामाजिक बदलामध्ये संविधानाची भूमिका’’ या विषयावर पूर्ण सत्र – 2 संपन्न होणार आहे. सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. रविंद्र मुन्द्रे भूषविणार असून रिसोर्स पर्सन्स म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनाई, अहमदनगरचे जगदीश सोनवणे व अमरावतीचे डॉ. वामन गवई उपस्थित राहतील. त्यानंतर लगेचच तांत्रिक सत्र होणार असून सत्राचे अध्यक्षस्थान परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे माजी संचालक डॉ.बी.आर. वाघमारे करतील.

समारोप सत्र

समारोप सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून मानव्यविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, विद्यापीठ अधिसभा सदस्य तथा सिताबाई कला महाविद्यालय, अकोलाचे प्राचार्य डॉ.आर.डी. सिकची, विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रताप अभ्यंकर व विद्यापीठाचे प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी उपस्थित राहतील.

तरी एकदिवसीय परिसंवादाला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. ंसंतोष बनसोड यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

Fri Mar 3 , 2023
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना या लोकाभिमुख असून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही शासकीय यंत्रणेची आहे. योग्य नियोजन व जनजागृती करून मार्च 2023 पर्यंत उद्दिष्टांची पूर्तता करावी असे निर्देष विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज विभागीय प्रादेशिक संचालक नगर परिषदेची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नगरपरिषदेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com