नागपुर :-कृषीक्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र यांना विकासाचा केंद्रबिंदु मानून संशोधन आणि शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला महत्व द्यावे. ग्रीन हायड्रोजन इथेनॉल फ्लेक्स इंजिन यासारख्या नवीन संशोधनावर व्हीएनआयटीने भर देऊन देशाच्या विकासा सोबत विदर्भाच्या विकासासाठी ही संशोधन करावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर यांच्या ६० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित हीरक महोत्सवात दिली.
आजही VNIT सारख्या संस्थेत प्रवेश मिळणे ही विद्यार्थी आणि पालक या दोघांना अभिमानाची अभिमानाची बाब आहे.येथून पदवी घेतलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात उत्तम अशी कामगिरी करीत आहेत तसेच संस्थेचे माजी विद्यार्थी अनेक उच्च पदावर कार्यरत असून त्यांचे तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात कार्य उल्लेखनीय आहे
या संस्थेने देशाला दिलेल्या अभियंत्यांनी त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या बळावर देशाच्या विकासाच्या योगदानात मोलाची भर टाकलेली आहे. संस्थेचे संचालक डॉक्टर पडोळे आणि संस्थेचे माजी विद्यार्थी यांच्या समन्वयाने संस्थेच्या आवारात उभारल्या गेलेले भोजनगृह आणि टेनिस कोर्ट हे उत्तम स्थापत्याचे बांधकाम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी”जय जवान जय किसान जय विज्ञान”हा नवीन कार्यक्रम देशाला दिलेला असून तंत्रज्ञानाला या सरकारची प्राथमिकता राहणार आहे.आत्मनिर्भर भारतासाठी उच्च दर्जाचे संशोधन गरजेचे आहे यालाच अनुसरून देशात स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान असलेले ४० योजनेचे प्रकल्प सुरू असून त्यावर अधिक संशोधन सुरू आहे
नवकल्पना,उद्यमशीलता,विज्ञान आणि तंत्रज्ञान,संशोधन कौशल्य,आणि यशस्वी सराव या सर्व गोष्टींचा समन्वय साधून आपण आपली प्रगती केली पाहिजे. ज्ञानातून अर्थाजनाकडे आपण आपला ओघ न्यायला हवा आणि सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे असेही त्यांनी सांगितले
महाराष्ट्रात विशेष करून विदर्भात ८० टक्के खनिज संपत्ती ७५ टक्के वनसंपदा अशी आहे तरी यावर उच्च दर्जाचे संशोधन VNIT कडून व्हावे असे त्यांनी सांगितले.
उत्तर भारतात प्रदूषणाची समस्या ही अत्यंत गंभीर असून पराली जाळण्याची पद्धत ही अत्यंत घातक आहे यावर उपाय म्हणून CSIR ने पराली वर संशोधन करून त्यातून बायो ब्युटीमिन आणि इथेनॉल निर्मितीवर यश मिळवलेआहे.
देशाच्या जीडीपीत कृषी क्षेत्राचा हिस्सा हा दिवसेंदिवस कमी होत जात असून कृषी क्षेत्रातील टाकाऊ उत्पादनांचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळायला हवा.
शेतकऱ्यांनी आता अन्नदाता म्हणून न राहता ऊर्जादाता म्हणून पुढे यावे आणि देशात होत असलेली १७लाख कोटींची इंधन आयात काही प्रमाणात कमी करण्यात योगदान द्यावे आणि देशाची इंधनाची समस्या सोडवण्यात पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
देशातील असंघटित क्षेत्रातील अनेक लोक हाताने सायकल रिक्षा ओढत असून ही एक प्रकारची अमानवीय प्रथाच आहे.डॉ.राम मनोहर लोहिया आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी या प्रथेला कडाडून विरोध केला याचाच भाग म्हणून सरकारने इ-रिक्षा आणि इ-कार्ट ही कमी अंग मेहनतीची नवीन संशोधने जनतेला दिली.
संस्थेच्या साठ वर्षाच्या काळात VNIT संस्थेने उच्च दर्जाचे संशोधन आणि उत्तम असे अभियंते देशाला दिले. संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त विद्यार्थी प्राध्यापक माजी विद्यार्थी यांना हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या