केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी नागपूरच्या रोजगार मेळाव्याला केले संबोधित, नागपुरात 210 जणांना शासकीय सेवेचे नियुक्तीपत्र वितरण

नागपूर :-केंद्र शासनाच्या सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपले ज्ञान वाढवण्यासाठी सतत अभ्यास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर ,आपल्या अभ्यासाचा जीवनात तसेच समाजासाठी उपयोग , हार्ड वर्क सोबतच स्मार्ट वर्क त्याचप्रमाणे आरोग्याची काळजी या पाच सूत्रीवर लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आज नागपूर मध्ये केले . मध्य रेल्वेच्या अजनी येथील रेल्वे सामुदायिक सभागृहात आज रोजगार मेळा अंतर्गत केंद्रशासनाच्या सेवेत दाखल होणाऱ्या 210 उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वितरण आज भागवत कराड यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक वर्षात १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याच्या संकल्प सिद्धी करिता देशभरात 45 स्थानावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या चौथ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार हून अधिक नवनियुक्तांना देशभरात विविध ठिकाणी नियुक्त पत्राचे वितरण झाले . या कार्यक्रमांतर्गत नागपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते . याप्रसंगी मध्य रेल्वेचे नागपूर क्षेत्र महाव्यवस्थापक तुषार कांत पांडे , दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग महाव्यवस्थापक नमिता त्रिपाठी , नागपूर क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल शुभा मधाळे प्रामुख्याने उपस्थित होते . या मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधानांचे भाषण सर्वांनी यावेळी ऐकले . याप्रसंगी नवनियुक्तांना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितलं की ,भारत हा जगातील सर्वात युवक असलेला देश आहे . नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करण्याकरिता केंद्रशासन विशेष लक्ष देत आहे . केंद्र शासनाने आतापर्यंत चार रोजगार मिळावे आयोजन केले असून यापैकी 22 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित पहिल्या मेळाव्यात 75 हजार 226 , 22 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित दुसऱ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार 56 ,20 जानेवारी 2023 रोजी तिसऱ्या रोजगार मेळाव्यात 74,426 तर 13 एप्रिल 2023 रोजी आयोजित चौथ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार 506 उमेदवारांना देशभरात नियुक्तीपत्र दिले जात असल्याची माहिती यावेळी कराड यांनी दिली .याप्रसंगी कराड यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे राबवल्या जात असणाऱ्या मुद्रा योजना , स्टॅंड अप योजना , स्टार्टअप इंडिया यासारख्या विविध योजनांची माहिती सुद्धा उपस्थितांना दिली . मुद्रा योजनेला यावर्षी आठ वर्षे पूर्ण होत असून या योजनेअंतर्गत दहा लाखापर्यंतचे विनातारण कर्ज युवकांना त्यांचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी दिले जात असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत 39 कोटी लोकांनी मुद्रा योजनेचा लाभ घेतला असून 69 टक्के प्रमाण हे महिलांचा आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केलं .

भारत सरकारने प्रोडक्ट लिंक इन्सेंटिव्ह – पी एल आय अर्थात उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत आयात कमी केली असून निर्यातीवर भर दिला आहे. भारताची अर्थव्यवस्था आज जगात पाचव्या क्रमांकावर पोचली आहे असे देखील त्यांनी सांगितलं.

मध्य रेल्वेचे नागपूर विभाग महाव्यवस्थापक तुषार कांत पांडे यांनी याप्रसंगी सांगितले की मध्य रेल्वेने या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत2 ,532 उमेदवारांना नोकरी दिली असून 7 ,000 वीन नियुक्तीचे नियोजन चालू आहे. आज नागपूर येथील रोजगार मेळाव्यात 210 नियुक्तीपत्र वितरित केले असून त्यामध्ये रेल्वे विभागात 156 डाक विभागात 5 ,भारतीय खान विभागात 17 , आयकर विभागात – 16 , केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये – 1 , केंद्रीय भूजल मंडळात – 1 नवोदय विद्यालय समितीमध्ये 1 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था येथे 1 . त्याचप्रमाणे आरोग्य विभाग एम्स मध्ये 1 अशा 210 नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले. या सर्व उमेदवारांना विविध विभागात असिस्टंट स्टेशन मॅनेजर , इन्स्पेक्टर , कॉन्स्टेबल , स्टेनोग्राफर , इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर ,टॅक्स असिस्टंट ,नर्स अशा विविध पदांवर नियुक्त केले जाणार आहे अशी माहिती तुषारकांत पांडे यांनी दिली.

या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी , नियुक्त उमेदवार, त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Thu Apr 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष बुद्ध वंदना -सकाळी 10.30वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्रात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  – ड्रॅगन पॅलेस व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आकर्षक विद्दुत रोषणाईने सज्ज कामठी :- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विविध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com