रंगीत कारंजांसह आधुनिक शिल्पाकृतीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

– जयप्रकाश नगर चौकात नागरिकांची गर्दी

– ४८ फूट उंच स्कल्पचर डिझाईन मुख्य आकर्षणाचे केंद्र

नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर कडे वाटचाल करणाऱ्या नागपूर शहराच्या सौंदर्यीकरणावर अधिक भर घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने जयप्रकाश नगर चौकात आकर्षक असे रंगीत कारंजे आणि भव्य आधुनिक शिल्पाकृती उभारण्यात आली आहे, जी वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहे, अशा सुंदर रंगीत कारंजे आणि भव्य आधुनिक ABSTRACT शिल्पाकृतीचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार(ता. १९) रोजी करण्यात आले. ही शिल्पाकृति ABSTRACT वर्गामध्ये भारतातील सर्वात मोठी आहे.

याप्रसंगी आमदार प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने, मनपाचे उपायुक्त रवींद्र भेलावे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, अर्बन डेव्हलोपमेंटचे वास्तुविशारद हर्षल बोपर्डीकर, तेजल रक्षमवार, राशी बावनकुळे, गोरज बावनकुळे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूरला आधुनिक, राहणेयोग्य आणि सुंदर शहर बनविण्याचे प्रयत्न मनपाचे आहेत.

वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या अशा जयप्रकाश नगर चौकात नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रंगीत कारंजे लावण्यात आले आहे. कारंज्यामध्ये आकर्षक अशी रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली आहे. 20 विविध प्रकारचे कारंजे लक्षवेधी ठरत आहेत. कारंजाच्या वरच्या बाजूस ‘वसुधैव कुटुंबकंम चे’ फलक लावण्यात आले आहे. कारंजाच्या अगदी समोरच्या भागात भव्य ‘द इनस्पिरिट’ नावाची आधुनिक शिल्पाकृती तयार करण्यात आली आहे. ही शिल्पकृती जवळपास 48 फूट उंच असून, स्टनलेस स्टीलद्वारे तयार करण्यात आली आहे. या भव्य आधुनिक शिल्पाकृतीचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या लोकार्पण प्रसांगी नागपूरकरांची मोठा गर्दी बघायला मिळाली. अनेक जण फोटो, व्हिडिओ काढून आनंद लुटतांना दिसले. नितीन गडकरी यांनी देखील लोकांच्या आनंदात सहभाग घेत फोटो काढले. अहमदाबादचे बिलोरीया हे या भव्य आधुनिक शिल्पकृतीचे निर्मितीकार आहेत व कंत्राटदार मे.एम.एस.भांडारकर व साई कंस्ट्रक्शन नागपूर आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : 1025 किलो प्लास्टिक जप्त

Tue Mar 21 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.20) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1028 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. लकडगंज झोन येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com