उद्योग व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय आणि संवाद असणे आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

– कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री – सीआयआय इंडस्ट्री अकॅडमीयाच्या परिषदेला केले संबोधित

नागपूर :- शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक आणि शैक्षणिक ज्ञानातून निर्माण होणारे संशोधन आणि परिसरातील विकास हे परस्पर पूरक असायला हवे. उद्योग विकासाकरिता त्या क्षेत्रातील उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये समन्वय आणि संवाद असणे आवश्यक आहे , असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले . नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ए.के. डोरले सभागृहात आयोजित कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री – सीआयआय विदर्भ क्षेत्र द्वारे आयोजित ‘इंडस्ट्री अकॅडमीया कॉन्क्लेव्ह ‘ प्रसंगी आयोजित ‘विदर्भामध्ये शैक्षणिक धोरणाला चालना ‘ या विषयावर ते आज बोलत होते.

उद्योग समूहांनी उद्योग विकासासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळवण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणीच्या माध्यमातून पुढाकार घेणे आवश्यक आहे . एव्हिएशन , माहिती तंत्रज्ञान , पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये विदर्भात रोजगार निर्मितीला खूप वाव असून यासाठी उद्योग समूहांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे . या उद्योगसमूहांनी स्टार्टअप परिसंस्था , कच्च्या मालाला तसेच स्थानिक मनुष्यबळाला योग्य रीतीने चालना देणे आवश्यक असून परिक्षण केलेल्या तंत्रज्ञानाने या क्षेत्रामधील उद्योग विकास करावा असे देखील गडकरी यांनी नमूद केले .

नागपूर मध्ये मदर डेअरी च्या 450 कोटीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील दुग्धविकासाला चालना मिळणार असून यातून 5 ते 7 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे , अशी माहिती देखील त्यांनी दिली .

दिवसभर चालणाऱ्या या कॉन्क्लेव्हमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आणि उद्योग विकासा संदर्भात योगदानाचे विचारमंथन करण्यात आले . यामध्ये सीआयआय विदर्भ प्रदेशचे पदाधिकारी आणि विदर्भातील 13 शिक्षण संस्थामधील शैक्षणिक तज्ञ यांनी सहभाग घेतला .या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सीआयआय विदर्भ क्षेत्रचे उपाध्यक्ष व्ही .सी जामदार यांनी केले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मालमत्ता कर स्वरुपात आतापर्यंत ४९.५० कोटी रुपये जमा

Sun Jun 23 , 2024
– त्वरा करा..३० जून पूर्वी ऑनलाईनरित्या मालमत्ता कर भरल्यास १५ टक्के सूट नागपूर :- नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त ऑनलाईन माध्यमातून पूर्ण कर रक्कम नागपुर महानगरपालिकेत निधीत जमा केल्यास १५ टक्के सूट दिली जात आहे. याशिवाय ऑफलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या मालमत्ता धारकास १० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com