नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या विविध विकास कार्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार २९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता नवीन पाण्याची टाकी, जयताळा रोड, नरकेसरी ले-आऊट येथे लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून, याप्रसंगी सर्वश्री आमदार प्रवीण दटके, ऍड. अभिजीत वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर अडबाले, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद अंतर्गत शासन निधीतून तयार करण्यात आलेल्या वर्धा रोड हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा बाजार चौक पर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे आणि केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत जयताळा येथील पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत जयताळा येथे पर्यावरण पूरक दहनघाटाच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड,अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता(प्र) नरेंद्र बोरकर यांनी केले आहे.
मनपाच्या विविध विकास कार्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते २९ जुलै रोजी लोकार्पण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com