वर्धा :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त केंद्रीय लघु आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी आज वर्धा येथील महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमला भेट दिली.यावेळी केंद्रीय लघु आणि मध्यम राज्य मंत्री भानु प्रताप सिंग वर्मा, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार पंकज भोयर, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टीआरएन प्रभू, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही बापूकुटीला भेट देऊन महात्मा गांधीच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सूतमाळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर बापूकुटीला भेट देत अखंड सूत कताईचे पाहणी केली.