मुंबईतील एनएमआयएमएस विद्यापीठ प्रांगणात “विकसित भारतासाठी युवा शक्ती ” या उपक्रमाच्या महाराष्ट्र शाखेचा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला शुभारंभ

– विकसित भारताच्या वाटचालीत तरुणांनी मोलाची भूमिका बजावली पाहिजे – केंद्रीय पर्यावरण मंत्री

– उद्याचा प्रगतीशील भारत घडवण्यासाठी सरकार आजच्या तरुणांना तयार करत आहे – केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव

मुंबई :- “आमची ‘अमृत पिढी’ या परिवर्तनीय युगाची फळे चाखण्यासाठी सज्ज असल्याची खात्री सरकार करत आहे. म्हणूनच, दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि उद्योजकीय महत्त्वाकांक्षा जोपासण्यावर भर देऊन सरकार आजच्या तरुणांना उद्याचा प्रगतीशील भारत घडवण्यासाठी तयार करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले. आज मुंबईतील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM’s) नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) येथे ‘विकसित भारतासाठी युवा शक्ती’ या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.

आपल्या मुख्य भाषणात, भूपेंद्र यादव यांनी युवा शक्ती आणि पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनात युवाशक्तीचे महत्त्व कथन केले. “भारतातील तरुण चैतन्यपूर्ण आणि दृढनिश्चयी आहेत आणि भारताला जागतिक नेता बनवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. आम्ही पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामानातील लवचिकतेसाठी कार्य करत असताना, युवा शक्तीने हरित आणि अधिक शाश्वत भविष्यासाठी नेतृत्व केले पाहिजे,” असे ते म्हणाले. भारताचे शाश्वत भविष्य उजळून टाकणाऱ्या तरुण ऊर्जेचे एका शक्तिशाली शक्तीमध्ये रूपांतर करणे हे सरकारचे ध्येय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विकसित भारत साध्य करण्यासाठी आर्थिक सुधारणांच्या महत्त्वपूर्ण महत्त्वाबद्दलही यादव यांनी भाष्य केले. त्यांनी आर्थिक परिदृश्य बदलण्याच्या आणि विविध क्षेत्रांमध्ये शाश्वततेला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या अनेक उपक्रमांवर प्रकाश टाकला. यादव यांनी अनेक अनावश्यक अनुपालन आवश्यकता काढून टाकणे, व्यवसायांसाठी प्रक्रिया लक्षणीयरीत्या सुलभ करणे आणि वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे याकडे लक्ष वेधले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून खेळांना प्रोत्साहन देण्यासाठीही शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

“आर्थिक विकास सुलभ करण्यासाठी, सरकारने गतिशक्ती उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश पायाभूत सुविधा आणि संपर्क सुविधा वाढवणे असून तो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) वाढीसाठी आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांनी स्टार्टअप परिसंस्थेमध्ये केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा उल्लेख करत उद्योजकतेसाठी सरकारच्या पाठिंब्यावर प्रकाश टाकला.

यादव यांनी सर्व सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि निरंतरता असायला हवी यावर भर दिला, “एका यशस्वी स्टार्टअप संस्कृतीसाठी आपण चक्राकार अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामध्ये वापरलेले तेल, रबर, ई-कचरा आणि घनकचरा व्यवस्थापित करण्याच्या शाश्वत पद्धतींचा समावेश आहे. तसेच हरित व्याप्ती वाढवण्यासाठी ग्रीन फंडची स्थापना महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जनासाठी सरकारच्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकताना, त्यांनी कार्बन फूटप्रिंट कमी करणाऱ्या आणि पर्यावरणाला प्रोत्साहन देणाऱ्या उपायांची अंमलबजावणी करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. नागरिकांनी एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकपासून दूर राहण्याचे, तसेच प्लास्टिकचा जबाबदारीने वापर करण्याचे आणि स्वयंशिस्तीची मानसिकता अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. तरुणांचा सहभाग भारताच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे., म्हणून त्यांनी तरुणांना शाश्वत पद्धतींसाठी समर्पित राहण्यासाठी प्रोत्साहित केले,

“युवकांनी शाश्वत विकासामध्ये बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे आणि तेच खऱ्या अर्थाने विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलू शकतात, यावर त्यांनी कार्यक्रमाचे महत्त्व सांगताना भर दिला. तरुणांनी स्वच्छ ऊर्जा मोहिमेसह एनएमआयएमएस विद्यापीठात आज हाती घेतलेल्या वृक्षारोपणाप्रमाणे अधिकाधिक वृक्षारोपण सुरू केले पाहिजे आणि स्थानिक समुदायांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान यादव ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण समारंभात सहभागी झाले.

“आम्ही एनएमआयएमएसमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना समृद्ध आणि शाश्वत राष्ट्र निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी वचनबद्ध आहोत”, असे एनएमआयएमएस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रमेश भट यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले. श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष आणि कुलपती अमरीश पटेल यांनी त्यांच्या वृक्षारोपण उपक्रमाद्वारे पर्यावरण आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल या कार्यक्रमात माहिती दिली.

युवा शक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि भारताच्या यशोगाथेत तरुणांनी सक्रियपणे सहभागी होण्याची गरज दर्शवणाऱ्या पंतप्रधानांच्या “जॉइन माय भारत” मोहिमेतील एका चैतन्यपूर्ण चित्रफीतीच्या प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात, युवा शक्ती, हरित उपक्रम, हवामान बदल आणि भविष्यासाठी भारताचा दृष्टीकोन या प्रेरणादायी सत्रासाठी एनएमआयएमएसमधील यशस्वी युवा महिला, प्रसिद्ध यूट्यूब इनफ्ल्यूएन्सर आणि ॲनिमेशन विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधानांनी न्यूयॉर्कमधील भारतीय समुदायाला केले संबोधित

Mon Sep 23 , 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये लाँग आयलंड येथे, एका कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या भव्य मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमाला 15,000 हून अधिक लोक उपस्थित होते. पंतप्रधानांचे भारतीय समुदायाने अत्यंत जिव्हाळ्याने आणि उत्साहाने स्वागत केले. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत-अमेरिकेचे संबंध भारतीय अमेरिकन समुदायाने अतिशय मोठ्या प्रमाणात समृद्ध केले असून, हे संबंध दोन महान लोकशाहींमधील संबंध वृद्धिंगत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!