– सामाजिक कार्यकर्ता शालिनी छाबडिया यांनी 350 निराधार बालकांना घडवली एक दिवसीय सहल
नागपूर :- रामटेक येथे महिला व बालविकास विभागअंतर्गत कार्यरत बालगृहातील बालकांचा अभ्यास दौरा तथा सहल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शालिनी छाबडिया यांच्या सहकार्याने 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली. साधारणत 350 बालगृहातील प्रवेशित बालके तसेच 50 अधिकारी, कर्मचारी सहभागी झाली होती.
पोलीस कमिशनर रवींद्र सिंगल यांनी मुलांच्या सहलीला हिरवा झेंडा दाखविला, प्रसंगी बालकांसोबत संवाद साधत मुलांना आयुष्यात खेळाचे व शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले. सकाळी रामटेक येथील चेरी फॉर्म या ठिकाणी सर्व बालके पोहोचले. वेगवेगळ्या वयोगातील बालक खेळामध्ये मग्न झाली होती .कुणी रॅकेटिंग, कोणी झुले, घसरगुंडी ,साहसी खेळ ,बंजी जम्पिंग असे अनेक खेळात मुले रममान झाले. ऐतिहासिक तसेच एक वेगळ्या वैशिष्ट्याने प्रसिद्ध कपूरबावडी येथे मुलांनी आनंद लुटला. मुलांशी हितगुज करण्यासाठी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भेट दिली प्रसंगी रामटेकचा इतिहास सांगत रामटेक विषयी कविता सादर केली.
प्रसंगी आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनातील पहिली सहल नक्कीच आठवते असे म्हणून बालपणीच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. मुलांनी आयुष्यात आमच्या समोर उभे राहून देशाचं राज्याचं आपल्या जिल्ह्याचे नाव उज्वल करावं असा आशावाद बाळगला. कार्यक्रमस्थळी विभागाबाबत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांबाबत माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री रणजीत कुऱ्हे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी दिली.
जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष रोशन बागडे, ज्येष्ठ वकील तथा माजी जिल्हा बार कौन्सिल अध्यक्ष कमल सुतूजा तसेच बार कौन्सिलच्या अन्य सदस्यांनी उपस्थित सर्व प्रवेशित बालकांना शाळेचा डब्बा भेट दिला. दुसऱ्याच्या जीवनात आनंद पेरला तर आपल्या जीवनात परमानंदच निर्माण होतो याचा अविश्वसनीय अनुभव काल मिळाला. एवढ्या मोठ्या पदावरती विराजमान असूनही समाजाप्रती आपले उत्तरदायित्व दाखवणारे पोलीस महानिरीक्षक नक्षलवादी विरोधी मोहीम संदीप पाटील, पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार , बालकांप्रती संवेदनशील नागपूर इन्कम टॅक्स कमिशनर संदीपकुमार साळुंखे यांनी मुलांमध्ये उपस्थित राहून मुलांचा आनंद द्विगुणीत केला. बालकल्याण समिती अध्यक्ष छाया गुरव यांनी जिल्हा कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित राहून बालकांसोबत आनंद साजरा केला.
अनंत कान्हेरे म्हणतात,”स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास!” याचा अनुभव प्रत्येक क्षणी बोस कुटुंबाकडून तसेच खंते कुटुंब यांच्याकडून येत होता. दुसऱ्यासाठी करायची तळमळ आणि धडपड काल मुलांच्या आयुष्यात ऐतिहासिक आनंद देऊन गेला.याचा मनाला अतिशय मोठा आनंद झाला. दिवसभरामध्ये चेरी फार्म येथील दिवस बालकांचा अतिशय आनंदाने गेला, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक येथे गड मंदिराची सांज शोभा बालकांनी अनुभवली.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कॅग ऑलरेंडर चेरी फॉर्मचे अमोल खंते , रजनी खंते यांनी तसेच मुलांसाठी ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या मुलांची आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांचे विशेष सहकार्य लाभले. जिल्हा महिला बालविकास कार्यालयातील सर्व कर्मचारी,सर्व अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी यांनी माननीय विभागीय उपायुक्त अर्पणा कोल्हे व जिल्हा महिला बालविकास अधिकारी रणजीत कुऱ्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.