नागपुर – श्रम एवं रोजगार मंत्रालय तथा कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मिहान, नागपुर ( रेल मंत्रालयाच्या अधीन भारत सरकार चा नवरत्न उपक्रम) यांच्या संयुक्त विदयमाने, मल्टीमोडल लोजीस्टीक्स पार्क, मिहान, नागपुर में ई-श्रम पंजीकरण कॅम्प चे आयोजन कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मल्टिमोडल लॉजिस्टिक्स पार्क, मिहान, नागपूर डेपो येथे 26 नोव्हेंबर 2021 रोजी कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने असंगठित कामगारांचे राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) वर नोंदणी शिबिर आयोजित केले. मा. उपमुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) नागपूर, किशोर कुमार मल्लिकजी यांच्या मार्गदर्शना खाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन संतोष कुमार सिंह, मुख्य प्रबंधक, कॉनकॉर मिहान टर्मिनल यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी सचिन शेलार, सहायक श्रम आयुक्त, नागपुर, प्रशांत तिरपुडे, एल ई ओ, नागपुर इत्यादि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. उपक्रमात येथे कार्यरत असलेल्या असंगठित कामगारांना सरकारी योजनांच्या बद्दल अवगत करण्याच्या व त्यांचे पंजीकरण करण्याच्या हेतूने आयोजित केला होता. ज्यामुळे त्यांना गरज भासल्यास, त्यांच्या किंवा त्यांच्या परिवारा साठी या योजनांचा लाभ घेता यावा.
कंटेनर कॉपोरेशन चा उपक्रम
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com