अमरावती :- ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या साडेतीनशे स्वयंसेवकांनी स्वस्तिक पॅटर्न प्रमाणे वाटिका तयार करुन 2100 झाडांचे वृक्षारोपण केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, महानगरपालिका, राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, बडनेरा आणि समाजकार्य महाविद्यालय, बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने हा अविस्मरणीय कार्यक्रम शुक्रवार दि.31 ऑगस्ट, 2023 रोजी संपन्न झाला.
यावेळी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, रा.से.यो. चे संचालक डॉ. राजेश बुरंगे, वृक्षप्रेमी ए. एस. नाथन, राम मेघे इंजिनिअरिंग कॉलेज, बडनेराचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शुभम कदम, समाजकार्य महाविद्यालय बडनेराचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी तुपटकर कार्यक्रमाधिकारी व रा.से.यो. विद्याथ्र्यांची उपस्थिती होती.