मतदारांच्या जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रमांवर भर – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर :- विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रती जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्व स्तरावरील मतदारांना हा उपक्रम आपला वाटावा, त्यांचा कृतिशील सहभाग वाढवा यासाठी विभागप्रमुखांनी तत्पर राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

स्वीप अंतर्गत उपक्रमाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे आदी अधिकारी उप‍िस्थित होते.

ग्रामीण भागाच्या बरोबरीने शहरी भागात मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी विविध उपक्रमांची निश्चिती करुन ते यशस्वीपणे राबविण्यावर स्वीप अंतर्गत भर दिला पाहिजे. जवळपास दोन लाख युवक आणि नवमतदारांची संख्या आहे. पात्र मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क अधिक उत्साहाने बजावता यावा यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नरत असून दिव्यांग ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्यासाठी संबंधित विभागांनी योग्य समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यात तीन नामनिर्देशनपत्र दाखल,काटोल, नागपूर उत्तर आणि नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज

Thu Oct 24 , 2024
नागपूर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज दुस-या दिवशी काटोल, नागपूर उत्तर आणि नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक याप्रमाणे तीन नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आले. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विनील रमेश चौरसिया (अपक्ष), नागपूर उत्तर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून संतोष तुळशीराम चव्हाण (विकास इंडिया पार्टी) तर काटोल विधानसभा मतदारसंघातून लिलाधर मारोतवार कुडे (अपक्ष) या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!