रायगड : रायगडमध्ये जिल्ह्यातील खालापूरजवळ गुरूवारी 20 जुलैला दरड कोसळली. या दरडीखाली अख्ख इर्शाळवाडी गाव दबलं गेलं. अशात आज तिसऱ्या दिवशीही तिथं शोध मोहिम सुरू आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय.
उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीत जात स्थानिकांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा शब्द दिला. सोबतच सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी एक आवाहन केलं आहे.
दरवर्षी अशा घटना घडत आहे. असं काही घडलं की मग आपण खडबडून जागे होतो. त्यासाठी धावपळ करतो. या घटनेत मी राजकारण करू इच्छित नाही. पण राजकारणी मंडळींसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. सर्वच पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. दरड कोसळण्याच्या घटना वारंवार होता कामा नयेत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.