संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी येथील कुंभारे कॉलोनी रहिवासी आंबेडकरी चळवळीचे कट्टर निर्भीड भीमसैनिक उदास बन्सोड यांची जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डी व्ही गवई यांनी नियुक्ती केली आहे.
उदास बन्सोड यांचे सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन त्यांचे समाजाविषयी असणारे आपुलकीचे स्थान पाहता व समाजात भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणारे म्हणून त्यांची ओळख आहे.यामुळे जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती भ्रष्टाचार विरुद्ध लढा देणारी एकमेव समिती आहे तर या समितीवर समितीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डी व्ही गवई यांनी कामठी चे उदास बन्सोड यांची नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
सदर निवडीबद्दल नवनियुक्त उदास बन्सोड यांनी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डी व्ही गवई, विदर्भ अध्यक्ष भगवान चांदेकर,व जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र नवघरे, सह समस्त पदाधिकाऱ्यांचे आभार मानले तर सदर निवडीमुळे उपरोक्त समितीच्या समस्त पदाधिकारी सह कामठी येथील माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर,दिपंकर गणवीर,सुमित गेडाम,सुभाष सोमकुवर, अनुभव पाटील,अंकुश बांबोर्डे, विलास बन्सोड,आनंद मेश्राम, महेंद्र कापसे, दिनेश पाटील,अनिल पाटील ,आशीष मेश्राम, नागसेन सुखदेवें,राजन मेश्राम,विलास वाघमारे,रायभान गजभिये,कृष्णा पटेल,सलमान अब्बास यासह समस्त सामाजिक स्तरावरून व मित्र परिवाराकडून उदास बन्सोड यांचे अभिनंदन करण्यात येत आहे तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन योग्य पद मिळाले याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.