यवतमाळ :- दिग्रस तालुक्यातील सावंगा व ईश्वरनगर येथील शिवसेना उबाठा गटाच्या तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला.
शुक्रवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालय, यवतमाळ येथे या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला. विकासाला साथ देत प्रवेश केलेल्या या सर्व कार्यकर्त्यांशी पालकमंत्री संजय राठोड यांनी संवाद साधत पक्षासाठी तळमळीने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख हरिहर लिंगणवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, दिग्रस तालुकाप्रमुख उत्तमराव ठवकर, माजी तालुकाप्रमुख राजकुमार वानखेडे यांच्यासह प्रवेशकर्ते अनिल बळीराम ठोर, कपिल कोरडे, समाधान पावणे, ज्ञानेश्वर लोहरे, लहुजी बहिरमकर, पवन कांबळे, विलास बळवंते, पवन सवळे, राजेश सवळे, शरद बावणे, अंगद मार्कंड आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.