राज्यातील सर्व नाट्यगृहांसाठी टाईप प्लॅन तयार करण्यात यावेत – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई :-  राज्यातील नाट्यगृहांचे आधुनिकीकरण आणि अद्यावतीकरण करताना राज्यातील सर्व नाट्यगृहांसाठी टाईप प्लॅन (नमुना नकाशा) तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

राज्यातील नाट्यगृहांच्या समस्यांबाबत मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाट्यनिर्माता दिलीप जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सर्व नाट्यगृहांसाठी ‘टाईप प्लॅन’ तयार करताना आसन क्षमतेप्रमाणे नियोजन करण्यात यावे. साधारणपणे 400, 600, 800 आणि 900 आसन क्षमतेसाठी आवश्यकता असणाऱ्या बाबी अभ्यासण्यात याव्यात. साधारणपणे प्रत्येक नाट्यगृहांसाठी 4 कोटी ते 10 कोटी रुपयांची आवश्यकता असून हा निधी कसा देता येईल याबाबतचा नियोजन आराखडा तयार करण्यात यावा. तसेच निधी वितरणाचे टप्पेही ठरवून घेण्यात यावेत.

राज्यात सध्या एकूण 83 नाट्यगृहे आहेत. यापैकी खाजगी 28 नाट्यगृहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित 51 आणि राज्य शासनाची 4 नाट्यगृहे आहेत. या सर्व नाट्यगृहांचे पुढील 10 वर्षांतील तंत्रज्ञानाचे बदल करताना आधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळेच या नाट्यगृहाचे नावीन्यपूर्ण नियोजन करुन काम करणे गरजेचे असल्याचेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ईको माइन टूरिजम के लिए वेकोलि एवं डायरेक्टरेट ऑफ टूरिजम के मध्य एमओयू

Thu Sep 29 , 2022
नागपूर :- दिनांक 27.09.2022 को विश्व पर्यटन दिवस के अवसर पर इको माइन टूरिजम को बढ़ावा देने के उद्देश्य से वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड एवं डायरेक्टरेट ऑफ टूरिजम, महाराष्ट्र सरकार ने एमओयू पर हस्ताक्षर किए। इस समझौते के अनुसार वेकोलि के सावनेर भूमिगत खदान, गोंडेगांव खदान, अदासा खुली खदान, अदासा मंदिर तथा सावनेर के महात्मा गांधी इको पार्क का पर्यटन सरलता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com