संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आडापूल साईबाबा मंदिरा समोर परस्पर दोन मोटरसायकल एकामेकावर धडकल्याने दोन तरुण ठार तर तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारचे मध्यरात्री 12,30 वाजता सुमारास घडली असून आर्यन उर्फ आयुष अमित कस्तुरे वय 19 वर्ष राहणार हमालपुरा कामठी ,) व जावेद पठाण बशीर पठाण वय 19 वर्ष राहणार मच्छी मार्केट कन्हान तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर असे मृतक तरुणाचे नाव आहेत.
जुने कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरबाज जलाउद्दीन शहा वय 24 वर्ष, जुबेर खान वय 22 वर्ष ,मृतक जावेद पठाण बशीर पठाण वय 19 वर्ष तिघेही राहणार मच्छी मार्केट कन्हान तालुका पारशिवणी जिल्हा नागपूर हे हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एमएच 40 बीए 1381 ने कामठी वरून कन्हानकडे ट्रिपल सीट जात असताना आर्यन उर्फ आरुष अमित कस्तुरे वय 19 वर्ष राहणार हमालपुरा कामठी याने त्याची होंडा डिओ गाडी क्रमांक एमएच 40 सीके 5561 वर त्याचा मित्र प्रेम मंगल मेश्राम वय 20 वर्ष राहणार नया बाजार कामठी हे दोघेही कन्हानवरून कामठी कडे येत असताना नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आडापूल साई मंदिर परिसरात महा मेट्रो रेल्वेचे काम चालू असून हायवे मार्गावर रोड ब्रेकर लावला असून रोड ब्रेकरवर दोन्हीही मोटारसायकल गाड्यांची आमोरासमोर मध्यरात्री साडेबारा वाजता सुमारास धडक झाल्याने पाचही तरुण गंभीर जखमी झाले पाचही गंभीर जखमी तरुणांना नागरिकांनी कामठी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी तपासून आर्यन उर्फ आयुष अमित कस्तुरे वय 19 वर्ष राहणार हमालपुरा याला मृत घोषित केले तर उर्वरित चारही तरुणावर कामठी नागपूर मार्गावरील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे सहा वाजता सुमारास जावेद पठाण बशीर पठाण वय 19 वर्ष राहणार मच्छी मार्केट कन्हान तालुका पारशिवनी यांचा मृत्यू झाला सदर घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला तर तीन तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांचे वर कामठी –नागपूर मार्गावरील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.