एकाच ठिकाणी सर्व कामांची माहिती मिळणे ही मोलाची बाब
मुंबई : एकाच ठिकाणी शासनाने केलेल्या सर्व कामाची माहिती मिळणे ही मोलाची बाब आहे. अतिशय सुंदर, सुरेख, सर्वसामान्य जनतेला समजेल असे स्पष्ट मुद्दे पहावयास मिळाले !’, ‘प्रत्येक आणि शेवटच्या घटकासाठी शासनाने केलेले काम मोलाचे आहे.’, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या सचित्र प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासनाच्या विविध योजना व विकासकामांवर आधारित महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ ते ५ मे २०२२ पर्यंत चित्रमय प्रदर्शन जुहू येथे भरवण्यात आले होते. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. प्रदर्शनाला सर्वच घटकातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
प्रदर्शन बघून खूप छान वाटले. महाविकास आघाडी चे सरकार महाराष्ट्रात खूप चांगले काम करत आहे.आपल्या कर्तृत्वाला सलाम. खूपच चांगले काम केले आहे, मुंबई शहर पाहून दुसऱ्या देशापेक्षा महाराष्ट्र राज्य चांगली प्रगती करत आहे. शासनाने खूप कामे केली आहेत. ती कामे आता अशा सचित्र प्रदर्शनामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतील अशा विविध प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केल्या.