भंडारा, दि. 26 : राज्यातील महाविकास आघाडी शासनाला दोन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची या पुस्तिकेचे जिल्हास्तरीय प्रकाशन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलिस अधिक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे उपस्थित होते.
राज्यात शासनाने कोरोना संकटाशी लढत असतांना वेगवेगळ्या आघाड्यांवर अधिक जोमाने काम करायला सुरूवात केली. संकटाचे संधीत रूपांतर केले. दोन वर्षात आरोग्य यंत्रणेच्या सक्षम बळकटीकरणासह विविध क्षेत्रात केलेल्या विकासकामांचे प्रतिबिंब या पुस्तिकेत उमटले आहे.