दुचाकी चोर पोलीसांच्या ताब्यात, चोरीची एक मोटारसायकल जप्त

नागपूर :- फीर्यादी नामे मयुर दत्तु श्रीरामे वय २७ वर्ष, रा. नवेगाव साधु यांनी त्याची होन्डा लीवो कंपनीची मो.सा. क्र. एम. एच. ४०/सी.एस.-७१७० ही दिनांक ०४/०६/२०२४ रोजी से रात्री दरम्यान दत्त कृपा लॉन उमरेड येथे उभी करुन ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोराने ती चोरून नेली अश्या रीपोर्ट वरून पो.स्टे. उमरेड येथे अप. क्र. २५२/२०२४ कलम ३७९ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा उमरेड पोलीस तपास करीत असताना गुन्ह्यात चोरी गेलेली मो. सा. ही दिघोरी नागपुर येथे एक ईसमाकडे असल्याची गुप्त माहीती पोलीसांना मिळाल्याने दिघोरी चौक नागपुर येथे जाउन सदर ईसमास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव सम्राट विलास गोस्वामी वय ३९ वर्ष, रा. रीधोरा पोष्ट सातगाव, तह, हींगणा जि. नागपुर असे असल्याचे सांगीतले असुन त्याच्या ताब्यातुन नमुद गुन्हह्यात चोरी केलेली मोटार सायकल होन्डा लीवो कंपनीची मो.सा. क्र. एम. एच. ४० सी.एस. ७१७० किंमती ५०,०००/- रू. हस्तगत करण्यात आली.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार उमरेड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोलीस अंमलदार प्रदिप बवरे, राधेश्याम कांबळे, पंकज बट्टे, गोवर्धन शहारे, सायबल सेलचे सतीश राठोड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिन्दू संत एवं संप्रदाय की बदनामी करनेवाली ‘महाराज’ फिल्म पर तत्काल प्रतिबंध लगाएं !

Thu Jun 13 , 2024
– पुणे आंदोलन द्वारा हिन्दू जनजागृति समिति की केंद्र सरकार से मांग ! नागपुर :- भारत साधु-संतों की भूमि है । संतों ने संपूर्ण विश्व में जाकर भारतीय संस्कृति, धर्म, ज्ञान, कला, सभ्यता, सदाचार, इसके साथ ही भगवद्भक्ति सिखाकर समाज को आदर्श जीवन जीने के लिए प्रोत्साहित किया है । ऐसा होते हुए भी अभिनेता आमिर खान के पुत्र जुनैद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com