वाघधरेवाडी येथुन घरासामोरून दुचाकी चोरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत वाघधरे वाडी येथील शेतक-यानी रात्री आपल्या घराच्या अंगणात ऊभी केलेली दुचाकी वाहन कुणीतरी अज्ञात आरोपीने चोरी केल्यान फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.

मंगळवार (दि.१०) ऑक्टोंबर ला रात्री ९ वाजता वाघधरे वाडी, प्रभाग क्र.१ तारसा रोड कन्हान येथील शेतकरी कैलाश बळीराम कुंभलकर वय ५३ वर्ष हे घरी येऊन हिरो होंडा पैशन प्रो दुचाकी क्र. एम एच ४० यु ९२९७ ही अंगणात हँडल तसेच पेट्रोल लॉक करुन उभी करून आपल्या परीवारासह जेवन करून झोपले. रात्री ११ वाजता अचानक लाईट गेल्याने ते आपल्या घराचे बाहेर निघाले तेव्हा दुचाकी अंगणात उभी होती. नंतर लाईट आल्यावर घरात जावुन झोपले . बुधवार (दि.११) ऑक्टोंबर ला सकाळी ५ वाजता नेहमी प्रमाने उठले असता त्याची दुचाकी अंगणात दिसुन न आल्याने तिचा आजुबाजुला विचारपुस करून शोध घेतला असता ती मिळुन न आल्याने दुचाकी हीरो होंडा पैशन प्रो क्र. एमएच ४० यु ९२९७ लाल काळ्या रंगाची जिचा इंजीन क्र.एचएआयओइडीएएच एम१९४५८ चेसीस क्र.एमबीएलएचए१ओजीएएचएम ओ२४१५ असलेली किमती अंदाजे १५,०००/- रु ची दुचाकी कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने फिर्यादी कैलाश कुंभलकर यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी अज्ञात चोरा विरुध्द कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून कन्हान थानेदार वरिष्ट पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सामान्य माणसाला सशक्त करणारा माहिती अधिकार कायदा - माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे प्रतिपादन

Thu Oct 12 , 2023
भंडारा :- अर्जदाराला माहिती अधिकारात दिलेली माहिती, संबंधित यंत्रणेने विभागाच्या वेबसाईटवर टाकावी त्यामुळे दिलेल्या माहितीत पारदर्शकता राहून ती सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील उपलब्ध राहील, असे मार्गदर्शन राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचे आयुक्त राहुल पांडे यांनी आज येथे केले. सामान्य माणसाला सशक्त करणारा माहिती अधिकार कायदा असल्याचे प्रतिपादन पांडे यांनी आज नियोजन सभागृहात आयोजित माहिती अधिकार सप्ताह या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com