संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
उपचारा दरम्यान दुचाकी सवारचा मृत्यु. ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बंद टोल नाक्या जवळ टेकाडी शिवारात टिप्पर ट्रक चालकाने दुचाकी वाहन चालकाला समोरून धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी सवार गंभीर जख्मी झाल्याने त्यास मेडिकल कॉलेज नागपुर येथे उपचाराकरिता दाखल केले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी टिप्पर ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार (दि.६) मे ला दुपारी ११ ते ११:३० वाजता दरम्यान बंद टोल नाका जवळ टेकाडी शिवारात टिप्पर ट्रक क्र. एम एच ४० ए के ७३०९ चा चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन दुचाकी वाहन क्र. एम एच ४० बी एम ५२६७ ला समोरून जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक क्रिष्णा लखुजी भिमटे वय ४८ वर्ष राह. सातगाव ता हिंगणा जि नागपु र व त्यांचे सोबत असलेले क्रिष्णा तुकाराम भोवते हे गंभीर जख्मी झाल्याने त्यांचा उपचारकामी प्रथम कामठी रुग्णालय येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन मेडिकल कॉलेज नागपुर ला पाठवुन दाखल केले असता उपचारा दरम्यान (दि. ११) मे ला क्रिष्णा तुकाराम भोवते चा मृत्यु झाला. घटनेचे कागदपत्रे (दि. १२) मे ला कन्हान पोलीस स्टेशन ला प्राप्त झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी क्रिष्णा लखुजी भिमटे च्या तक्रारीने आरोपी टिप्पर ट्रक चालका विरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) भादंवि सहकलम १८४, १३४ अ, ब मोवाका कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मोहन शेळके हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.