संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- नागपुर जबलपुर महामार्गावर बंद टोल नाका हायवे पोलीस चौकी समोर टेकाडी तार कंपनी जवळ एका पांढ-या रंगाच्या अर्टिका कार मनसरकडुन नागपुर कडे भरधाव वेगाने, निष्काळजीपणे कोणतेही इंडीकेटर न देता आपली लेन बदलली त्यामुळेच मागुन येणारी दुचाकीची धडक लागुन झालेल्या अपघातात जख्मी दुचाकी चालकांचा उपचारा दरम्यान मुत्यु झाला.
शनिवार (दि.२२) ला मेडीकल पेलीस बुथ पो. हवा राजेश माकडे यांचा द्वारे प्राप्त माहिती नुसार मृतक अंकुश कुमार नेगी भारती वय २० वर्ष रा. स्नबेली तह. जि. सिवनी हा (दि.२१) जुन ला सकाळी ८ वाजता दुचाकी क्र. एम पी २२ एमएन ४०५७ हे स्वत: आपले गावावरून नागपुरला जात असतांना पो. स्टे कन्हान हद्दीत हायवे रोडवरील बंद टोल नाका हायवे पोलीस चौकी समोर टेकाडी तार कंपनी जवळ एका पांढ-या रंगाच्या अर्टिका कार मनसरकडुन नागपुर कडे भरधाव वेगाने येवुन निष्काळजीपणे कोणतेही इंडीकेटर न देता आपली लेन बदलली त्यामुळेच मार्गा वर मागुन येणारी दुचाकीची धडक लागुन झालेल्या अपघातात मृतक खाली पडुन डोक्याला, चेह-याला, छातीला व हातापायाला मार लागुन जखमी झाल्याने प्रथमोपचार मेओ हॉस्पीटल सरकारी दवाखाना नाग पुर नंतर मेडीकल नागपुर येथे (दि.२१) ला भर्ती केले असता वार्ड चे डॉक्टरांनी तपासुन (दि.२२) ला ५.१५ वाजता मृत घोषित केले. मृतकाचे पीएम करून नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले. सदर सुचना कन्हान पोस्टे ला (दि.२३) जुन ला सायंकाळी ५ वाजता प्राप्त झाल्याने कन्हान पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पो. हवा नरेश श्रावणकर हयानी सरकार तर्फे पो. हवा सचिन वेळेकर यांचे फिर्यादी वरून अप क्र. ४२६/२०२४ कलम २७९ ३०४ भादंवि सह कलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.