– फिर्यादी नागपुर येथील रहीवाशी
– रामटेक आले होते लग्नकार्यासाठी
रामटेक :-रामटेक ला लग्नकार्यात आलेल्या नागपुर येथील आगलावे दाम्पत्याला लग्नकार्यासाठी येणे चांगलेच महागात पडले असुन दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगमधील सोने तथा रोख रक्कम मिळुन तब्बल एक लक्ष नऊ हजार दोनशे रुपयांवर हात साफ करून पोबारा केला. रामटेक बसस्थानक परिसरात सदर घटना घडलेली असुन आगलावे परिवाराने याची तक्रार रामटेक पोलिस स्टेशन येथे केलेली आहे. रामटेक पोलिसांनी तपास सुरु केलेला आहे.
पो.स्टे. रामटेक अंतर्गत ०१ किमी अंतरावर असलेल्या रामटेक बसस्थानक आउटर गेट येथे दिनांक २८/०६/२०२३ चे दुपारी पावनेचार वाजता दरम्यान फिर्यादी लक्ष्मण गजाननराव आगलावे, वय ६३ वर्ष रा. सी पी अँड बेरार कॉलेज जवळ डांगे बिल्डींग मागे तुळशिबाग पोलीस ठाणे कोतवाली नागपुर कोतवाली नागपुर शहर हा त्यांची पत्नी नामे छाया लक्ष्मण आगलावे, वय ५८ वर्षे हिचेसह त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नाला राहते घरून जात होता. यावेळी आगलावे यांचे पत्नी जवळ सोन्याचे दागीने तथा काही रोख रक्कम असलेली बॅग होती. ते रामटेकला टक्कामोरे सेलीब्रेशन हॉल, रामटेक येथे लग्नाकरीता हजर झाले. लग्न आटोपल्यानंतर त्याच दिवशी दुपारी अंदाजे ०३.३० वा. चे दरम्यान लग्न हॉल येथून रामटेक बसस्टॅंड करीता निघाले. दोघेही ०३.४५ वा. चे दरम्यान रामटेक बसस्थानक येथे पोहचले तेव्हा दुपारी ०३.५० वा. रामटेक वरून नागपूरला जाणारी बस ही बसस्थानकाच्या आऊटर येथे आली बस मध्ये चढत असतांनी त्यामध्ये खुप गर्दी होती नंतर बस मध्ये आत प्रवेश केला असता थोड्या अंतरावरती बस मधील दोघा अज्ञात पुरुषांनी बस थांबवायला लावली व ते दोन अज्ञात व्यक्ती बसमधुन उतरले. ते दोघे अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील होते त्यापैकी एकाने अंगात पिवळया रंगाची टि शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातली होती व दुसऱ्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. नंतर फिर्यादी गणेशपेठ बसस्थानक नागपूर येथे उतरून ऑटोने सांयकाळचे ०६.०० वा. दरम्यान घरी पोहचले. फिर्यादीच्या पत्नीने घरच्या कुलुपाची चावी काढण्याकरीता तिच्या जवळील बॅग उघडली असता तिचे बॅगमध्ये सोन्याचे दागीने व रोख १२०० /- रू. नव्हते व आतिल पॉकीटची चैन ही उघडी होती. तेव्हा आपला ऐवज चोरी गेला असल्याचे त्यांना कळुन चुकले. तेव्हा दुसऱ्याच दिवशी आगलावे दाम्पत्य दिनांक २९/०६/२०२३ रोजी परत रामटेक येथील पोलीस ठाणेला तक्रार देण्यासाठी गेले असता तेथील पोलीसांनी बसस्थानक येथील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले . तेव्हा बसमध्ये चढतांना गर्दी होती व नंतर बस सुटल्यावरती दोन अनोळखी संशयीत इसम हे उतरतांनी दिसुन आले. दोन अनोळखी संशयीत इसम यांनी फिर्यादीच्या पत्नीचे दागीने तिने ठेवलेल्या निळया रंगाचा हॅन्डबॅग मधुन १) एका काळ्या मण्याचा पोतमध्ये १२ सोन्याचे मनी व एक पदक वजन अंदाजे १२ ग्रॅम किंमती अंदाजे ७२,०००/- रू २) कानातले दोन सोन्याचे रिंग वजन ०६ ग्रॅम महागडे किंमती अंदाजे ३६००० /- रू ३) नगदी रुपये ज्यात दोन ५०० /- रू. दराची व दोन १००/- दराच्या नोटा १२०० /- रू असा एकूण १,०९,२०० /- रुपयाचा मुद्देमाल बसस्थानक रामटेक येथील बसमध्ये चढलेल्या व नंतर थोड्या अंतरावर उतरलेल्या दोन अनोळखी संशयीत इसमांनी चोरून नेले असल्याचे कळुन चुकले. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीविरुध्द कलम ३७९, ३४ भादंवी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नायक मंगेश सोनटक्के करीत आहे.