प्रजासत्ताक दिनी रमानगरचे दोन अल्पवयीन बालके बेपत्ता

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रेल्वे क्रॉसिंग जवळील रहिवासी 14 वर्षोय दोन अल्पवयीन बालके घरासमोरिल अंगणात खेळता खेळता बेपत्ता झाल्याची घटना काल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 6 दरम्यान घडली असून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन बालकाचे नावे आयुष मुकेश बावनगडे व आर्यन अंकुश पाटील हे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता झालेला आयुष बावंनगडे ची आई लीना मुकेश बावंनगडे ह्या मोलमजुरी करून काल सायंकाळी सहा वाजता घरी आले असता आयुष घरी न दिसल्याने लहान मुलाला विचारपूस केली असता आयुष आपल्या मित्रांसह बाहेर खेळत असल्याचे सांगताच आर्यन च्या घरी गेले असता हे दोन्ही मुले घरी दिसून आले नाही तेव्हा खेळता खेळता बेपत्ता झाल्याचे लक्षात आले मात्र शोधाशोध घेऊनही कुठेही थांगपत्ता न लागल्याने अखेर पोलीस स्टेशन ची पायरी चढत फिर्यादी लीना बावंनगडे ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भ-मराठवाड्यातील उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा 'पॅटर्न ' आणणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sun Jan 28 , 2024
– नागपूरमध्ये खासदार औद्योगिक महोत्सव तसेच ॲडव्हांटेज विदर्भाच्या तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात – गडकरी-फडणवीस यांचे ‘डबल इंजिन ‘ विदर्भाचा सुवर्णकाळ – नारायण राणेhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 – नागपूर येत्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार – नितीन गडकरीhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 नागपूर :- उद्योग व्यवसाय तुलनेने कमी असणाऱ्या विदर्भ, मराठवाडा या भागात उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणारा पॅटर्न महाराष्ट्रात लवकरच राबविला जाईल, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com