संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा परिसरातून दोन तरुण दोन वेगवेगळ्या दुचाकीने मेफेडोन(एम डी )पावडर गुप्तचर पद्धतीने वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच धाड घालून दोन्ही आरोपीना ताब्यात घेत त्यांच्याकडून 14 हजार रुपये किमतीचा एम डी पावडर,दोन दुचाकी,मोबाईल व ईतर साहित्य असा एकूण 1 लक्ष 21 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाही काल दुपारी 2 वाजता दुर्गा माता मंदिर जवळ मोंढा येथे करण्यात आली.तर ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही एम डी वाहतूक दारा विरोधात भादवी कलम 8 (क)22(अ),29 एनडीपीएस कायद्यांनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.
अटक आरोपीचे नाव उस्मान खान सलीम खान वय 29 वर्षे रा चित्तरंजन दास नगर,कामठी तसेच रितेश राकेश चव्हाण वय 32 वर्षे रा रामगढ कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त ,एसीपी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गावंडे व पोलीस पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे