गोरेवाडा प्राणी उद्यानातील दोन बिबट्यांची प्रसुती आणि ४ शावक सुरक्षित

नागपूर :- बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यान येथे रविवार 17 एप्रिल रोजी पहाटे चिंकी या मादी बिबटने २ बछड्यांना जन्म दिला तर सोमवारी सकाळी रुची या बिबट मादीने ३ बछड्यांना जन्म दिला. रुचीने ३ पिल्लांना स्विकारले असून ती त्यांचा व्यवस्थित संभाळ करत आहे.

रविवारी, चिंकीचे पहिल्या शावकाची प्रसूती सुरक्षित झाली, परंतू दुसरे शावक प्रसुती दरम्यान गर्भातच मृत पावले व या दरम्यान रक्तस्राव होऊन संसर्ग झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या पहिल्या पिल्लाला कृत्रिमरित्या संभाळले जात आहे.

या बिबट्यांची प्रसूती व्यवस्थित होणेसाठी गोरेवाडा प्रशासनाकडून विशेष काळाजी घेण्यात आली होती. दोन्ही माद्यांना स्वतंत्र बाळंतगुफा तयार करुन त्यांच्यावर सीसीटिव्हीच्या माध्यमातून २४ तास लक्ष ठेवण्यात येत होते. त्यांच्या दैनंदीन आहारासोबत विशेष आयुर्वेदीक पोषक तत्वे माद्यांना नियमित देण्यात येत होते.

सदर प्रसुती दरम्यान प्राणिसंग्रहालय संचालक, एस. एस. भागवत, पशुवैद्यक डॉ. मयुर पावशे, अभिरक्षक दिपक सावंत आणि सहा. वनसंरक्षक सारिका खोत उपस्थित होते. चिंकीच्या उपचाराकरिता वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे पशुवैद्यक डॉ. सुजित कोलंगथ यांच्या मदतीने उपचार सुरु आहेत. चिंकीच्या प्रसुतीसाठी ऍनिमल किपर संतोष पायघन आणि राम नान्हे तर रुचीसाठी निलेश चिंतनवार आणि शैलेश गवळी यांनी विशेष मेहनत घेतली.

एफडीसीएम गोरेवाडा झू लि. चे अध्यक्ष विकास गुप्ता यांनी संपुर्ण टिमचे अभिनंदन केले आहे. या प्रक्रियेत वन विकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौड आणि महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन यांनी मार्गदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठाच्या उन्हाळी -2023 लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

Wed Apr 19 , 2023
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाव्दारे घेण्यात येणा-या उन्हाळी -2023 च्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून दुरुस्ती/सुधारित / नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून यासंबंधी सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, परीक्षा केंद्रांना पत्राव्दारे कळविण्यात आलेले आहे. तरी याची सर्वसंबंधित विद्यार्थी, महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, परीक्षा केंद्र यांनी नोंद घ्यावी, अधिक माहिती हवी असल्यास परीक्षा व मूल्यमापन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!