ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये वाहनांच्या दोन कि.मी. रांगा, प्रवाशांना फटका

नागपूर :- अमरावती मार्गावर ट्रकचालकांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे नागपूरकडे येणाऱ्या तसेच नागपूरहून अमरावतीकडे जाणारी वाहने अडकून पडली असून दोन कि.मी.च्या रांगा लागल्या आहेत.

‘हिट ॲण्ड रन’ च्या संदर्भात केंद्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला विरोध म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रक चालकांनी नागपूरसह देशभरात रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. नागपूरमध्ये अमरावतीकडे जाणाऱ्या महामार्गावर हे आंदोलन सुरू आहे. दोन्ही बाजूंनी दोन-दोन कि.मी. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यात एस.टीचा समावेश आहे.

प्रवाशांचे हाल होत आहे. भंडारा जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पारडी येथे आंदोलन सुरू असून तेथेही अशाच प्रकारची स्थिती आहे. अनेक प्रवाशांनी एस.टी.मधून उतरून इतर वाहनांचा पर्याय शोधने सुरू केले आहे. रस्ता रोकोमुळे पेट्रोलपंपाकडे दुचाकीस्वारांना किंवा अन्य वाहनांना जाता येत नसल्याने त्यांचीही अडचण झाली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून साजरा

Mon Jan 1 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-1 जानेवारी 1818 साली झालेल्या भीमा कोरेगावच्या रंनसंग्रमात पेशव्यांच्या सैन्यविरुद्ध जिंकु किंवा मरू या भावनेशि 28 हजार पेशव्या सैनिकाना फ़क्त 500 महार सैनिकांनी ठार मारुंन विजय मिळविला होता तेव्हा या वीर भीम सैनिकांच्या स्मरणार्थ आज कामठीत प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी वतीने 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन 206वा महोत्सव वर्ष म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com