कांद्री व निलज शेत शेतात विज पडुन दोघाचा मुत्यु तर तीन जख्मी.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – कांद्री-बोर्डा टोल नाक्याच्या मागील शेतात धानाची लावन चालु असताना एकाएक विज पडुन राधेलाल डहारेचा मुत्यु झाला तर दोन शेत मजुर किर कोळ जख्मी झाले तर दुस-या घटनेत निलज शिवारा तील शेतात विज पडल्याने महिला शेत मजुर नंदाबाई खंडातेचा मुत्यु झाला असुन दुसरी महिला रेखा चौधरी गंभीर जख्मी झाल्याने खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
गुरूवार (दि.४) ऑगस्ट ला सायंकाळी ४.१५ वाजता दरम्यान विजेच्या कडकडयाका सह पाऊस आल्याने नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील कांद्री-बोरडा टोल नाक्याच्या मागील शेतात धानाची लावनी चे काम करण्यारे राधेलाल भिमराव डहारे वय २५ वर्ष राह. आजनी (फुटाणे ची) ता. रामटेक या शेत मजुरांच्या अंगावर विज पडुन त्याचा मुत्यु झाला तर सोबत काम करणारे दोघे किरकोळ जख्मी झाले. मृतक राधेलाल डहारे यांचा मृतदेह ग्रामिण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे नेण्यात आला. दुसरी घटना सायंकाळी ४.३० वाजता दरम्यान निलज (खंडाळा) शिवारातील शेतात विज पडुन शेतात धानाच्या लावनी चे काम करणारी नंदाबाई रामकृष्ण खंडाते वय ३२ वर्ष राह. निलज ता. पारशिवनी हिचा अंगावर विज पडुन मुत्यु झाल्याने तिचा मुतदेह ग्रामिण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे नेण्यात आला. तसेच सोबत काम करणारी रेखा मुकेश चौधरी वय ३५ वर्ष राह. निलज (खंडाळा) ही गंभीर जखमी झाल्याने कन्हान येथील खाजगी वानखेडे दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात येत आहे. घटनेची माहीती मिळताच कन्हान पोलीस, पटवारी घटनास्थळी पोहचुन पंचासह पंचनामा करण्यास पोहचले.

“दामिनी अँप” मुळे विज पासुन प्रतिबंधात्मक उपाय.

विदर्भातील सर्व जिल्हयात  जिल्हाधिका-यांनी ग्राप पदाधिकारी, सचिव, कर्मचारी, पटवारी, मंडळ अधिकारी, तालुका व पंचायत समिती आणि कृषी अधिकारी , कर्मचा-यांना भारत सरकार चा “दामिनी अँप ” डाऊन लोड करण्याच्या आदेश व सुचना दिल्या आहे. कारण दामिनी अँप हे परिसरात विज पडण्याची पुर्व सुचना मोबाईलवर देत असल्याने विजे पासुन नागरिकांच्या जिव वाचवुन मुत्यु च्या घटना कमी करता येऊ शकते. परंतु नागपुर जिल्हया तील पारशिवनी तालुक्यात या आदेश व सुचनाची शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी बहुतेक अमल बजावनी करताना दिसत नसल्याने तालुक्यात विज पडुन मुत्युचे प्रमाण वाढत आहे. आता तरी ” दामिनी अँप ” आपल्या मोबाईल मध्ये डाऊन लोड करून विजे पासुन आपल्या परिसरातील नागरिकांची सुरक्षता करता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागरी समस्या निवारण केंद्रांद्वारे आतापर्यंत 593 तक्रारींचे निराकरण

Fri Aug 5 , 2022
नागपूर : नागरिकांच्या मुलभूत तक्रारींच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे झोनस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण कक्षांना ‘नागरी समस्या निवारण केंद्र’ म्हणून कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गुरुवारी 4 ऑगस्ट पर्यंत झोन स्तरावर नागरी समस्या निवारण केंद्रांमध्ये 856 तक्रारी प्राप्त झालेल्या असून आतापर्यंत दहाही झोनमधील 593 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com