अरोली :- खात रोड,भंडारा सेंट मेरी शाळेत 9 व 10 जानेवारीला पालकांच्या स्पर्धा आटोपल्यानंतर आज 11 जानेवारी शनिवार सायंकाळी सहा पासून दोन दिवसीय स्नेहसंमेलनाला सुरुवात होत आहे.
स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे ,प्राथमिक शिक्षणाधिकारी आर एस सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
उद्या 12 जानेवारी रविवारला सकाळी नऊ वाजता पासून बक्षीस वितरण या स्नेहसंमेलनाच्या समारोप होणार आहे. तरी या स्नेहसंमेलनाला शाळेतील नर्सरी ते दहाव्या वर्गापर्यंत शिकणारे सर्व विद्यार्थी व त्यांच्या सर्व पालकांनी उपस्थित राहून स्नेह स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्साह वाढवावा व त्यांच्या सुप्त गुणांचा गुणगौरव करावा, असे आव्हान या शाळेतील प्राचार्य ज्योती दुबे यांनी केले आहे.
सेंट मेरी शाळा ही भंडारा शहरातील खात रोडवर स्थित असून, येथील शिक्षणाच्या दर्जा पाहून नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खात रेवराल व अरोली कोदामेंढी या जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणारे गावातील शंभरच्या वर विद्यार्थी या शाळेत रोज शाळेच्या बसने अपडाऊन करून शिक्षण घेत आहेत व या शाळेची शाखा मागच्या वर्षी मोदा तालुक्यातील खात नजदीक असणाऱ्या देवमुंढरी येथे उघडण्यात आलेली आहे हे विशेष!