अरोली :- येथून जवळच गट ग्रामपंचायत तांडा अंतर्गत येत असलेल्या श्रीखंडा येथे मागील नऊ वर्षापासून सुरू असलेली परंपरा यंदाही कायम असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला उद्या सात जानेवारी मंगळवारपासून दोन दिवसीय मंडई उत्सवाला सुरुवात होत आहे.
मंडईनिमित्त उद्या सात जानेवारी मंगळवारला दुपारी दोन वाजेपासून शाहीर नीलकंठ लेंडे साथी विलास सेलोकर, रामकृष्ण लेंडे, सुखराम खराबे यांच्या संपूर्ण पार्टीसह दंडार, रात्री नऊ वाजता डान्स ग्रुप भंडारा ची लावणी, आठ जानेवारी बुधवार ला सकाळी नऊ वाजेपासून शाहीर ब्रम्हा शाहीर, प्रकाश हजारे, सुभाष नवघरे यांचे संपूर्ण पार्टीसह राष्ट्रीय संगीत खडा तमाशा, रात्री नऊ वाजता नागपूर येथील यादगार डान्स ग्रुपच्या डान्स हंगामा, या कार्यक्रमांचे श्रीखंडवासी व आयोजकांनी आयोजन केलेले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार श्याम कुमार बर्वे, कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य अतिथी अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, जि प सदस्य योगेश देशमुख, पंचायत समिती मौदा सभापती स्वप्नील श्रावणकर ,जि प माजी अध्यक्ष सुरेश भोयर, नागपूर ग्रामीण काँग्रेस महासचिव राजाभाऊ तिडके, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे, जि प सदस्य राधा मुकेश अग्रवाल, भगवान बावनकुळे ,तापेश्वर वैद्य, दुर्गा ठाकरे, पंचायत समिती सदस्य अनिल बूराडे ,दीपक गेडाम, रमेश कारेमोरे, मुकेश अग्रवाल, अशोक हटवार मुरली तांबुलकर ,श्रीहरी थोटे, तांडा सरपंच विनोद गभने, उपसरपंच राजेंद्र खंदारे, पोलीस पाटील श्रीखंडा लहानाबाई बागडे, मुख्याध्यापक श्रीरंग पाटील, मोरगाव सरपंच नंदलाल पाटील, उपसरपंच पितांबर नन्होरे, वाकेश्वर सरपंच गायत्री बादूले, उपसरपंच पवन घोडमारे ,तांडा माजी सरपंच मेहमूद्दीन तुरक, माजी उपसरपंच चंद्रशेखर जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बांगरे विष्णू चवळे प्रहार तालुकाप्रमुख टिकाराम सपाटे सह गाव व परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील राज्यातील, ग्रामपंचायत चे सर्व ग्रामपंचायत सदस्यगण, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक व राजकीय पुढारी, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान आयोजक व समस्त श्रीखंडावाशी यांनी केले आहे.