अरोली :- येथून जवळच असलेल्या इंदोरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांत व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दोन दिवसीय मंडईचे आयोजन आज दिनांक 30 जानेवारी गुरुवारपासून होणार आहे. 30 जानेवारी गुरुवारला रात्री आठ वाजता कन्हैया लावणी डान्स ग्रुप वडसा यांच्या सांस्कृतिक लावणी कार्यक्रम. 31 जानेवारी शुक्रवारला सकाळी शाहीर मोरेश्वर भाऊ मेश्राम कलंगी पाटी दुधाळा यांच्या राष्ट्रीय संगीत खडा तमाशा व रात्री आठ वाजता आश्विन ग्रुप नागपूर यांच्या सांस्कृतिक लावणी कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमांना जय भवानी साऊंड सिस्टिम व डेकोरेशन यांच्या कर्ण मधून आवाजाची साथ मिळणार आहे.
या कार्यक्रमाला गावातील परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुढारी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार असून या दोन दिवसीय मंडई उत्सवाच्या लाभ घेण्याचे आव्हान समस्त इंदोरा ग्रामवासी यांनी केले आहे.