घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

नागपूर :- पो. ठाणे हुडकेश्वर हद्दीत, लवकुश नगर, लॉ.नं. ९६, मानेवाडा रिंगरोड, नागपुर येथे राहणारे फिर्यादी डॉ. लिलाधर विठोबा कुर्जेकर वय ६३ वर्ष, हे नमुद ठिकाणी वरचे माळ्यावर राहत असून, खाली त्यांचे फिनलँड रेस्टॉरंट अँड बार आहे. रात्री बार चे शटरला कुलुप लावुन ते वरचे माळ्यावर झोपले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे रेस्टॉरंट अँड बार चे बेसमेंटमध्ये असलेले शटर्सचे लॉक तोडुन आत प्रवेश करून, रेस्टॉरंट अॅड वार मधुन वेगवेगळया दारूचे बॉटल्स, सी. सी. टी. व्ही. चा डी. व्ही. आर. व नगदी ५०,००० / असा एकुण १७९८४० / चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८०, भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हयाचे संमातर तपासात गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या खात्रीशिर गुप्त बातमीदाराचे माहिती करून सापळा रचुन आरोपी १) राकेश दिलीप दास, वय ३१ वर्ष, रा. महाजनवाडी, वानाडोंगरी, एम. आय. डी. सी. २) अनुप सुधिर पाटील वय ३१ वर्ष रा. प्लॉट न. ४३, शुभम नगर, हिंगणा रोड, नागपूर यांना ताब्यात घेवून त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपिनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हा करतांना वापरलेला थिसीटर अॅटो किंमती ८०,०००/- रु चा जप्त करण्यात आलेला आहे. आरोपांना मुद्देमालासह पुढील कार्यवाहीस्तव हुडकेश्वर पोलीसांचे ताब्यात दिलेले आहे.वरील तिन्ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. अनिल ताकसांडे, पोहवा नुतनसिंग छाडी, बबन राउत, विनोद देशमुख नापेअ. रविद्र राउत,मनोज टेकाम, शुशांत सोळंके, सोनू भावरे, अगर रोठे, हेमंत लोणारे, योगेश सातपुते, रितेश तुमडाम यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक

Tue Jul 25 , 2023
नागपूर :- फिर्यादी नरेश खेमचंद पाठक वय २० वर्ष रा. कस्तुरबा नगर, प्लॉट न. २११, जरीपटका, नागपुर हे घरी हजर असतांना त्यांना घराबाहेर आवाज आल्याने ते व त्यांचा भाऊ रवि पाठक वय २२ वर्ष व आई आरती पाठक वय ४२ वर्ष हे तिथे घराबाहेर आले असता त्यांचे घराजवळ राहणारा राजु बिसाऊ शाहु वय ३२ वर्ष याचे सोबत अॅक्टीवा गाडीवरून आलेले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!