संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27 :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया गोदाम बागडोर नाल्याजवळ काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशाने नागपूर हुन कामठीत हातात धारदार चाकू घेऊन अवैधरित्या शस्त्र बाळगनाऱ्या दोन आरोपीना नवीन कामठी पोलिसांनी वेळीच अटक केल्याने होणारा अनर्थ टळला.ही कारवाही काल रात्री साडे अकरा वाजता केलीं असून दोन्ही आरोपीना भारतीय हत्यारबंदी कायदा कलम 4/25, (34) सहकलम मुंबई पोलीस कायदा 135 अनव्ये गुन्हा नोंदवित अटक करण्यात आले असून अटक आरोपीचे नाव असरफ खान उर्फ राजा कॅक असलम खान वय 23 वर्षे , शेख शाकिर उर्फ मोनू शेख अमीर वय 27 वर्षे दोन्ही राहणार बडा ताजबाग नागपुर असे आहे.
ही यशस्वी कारवाही डीसीपी आव्हाड , एसीपी नयन आलूरकर , पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी स्कॉड चे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, डी बी स्कॉड चे संदीप सगणे, संदेश शुक्ला,सुरेंद्र शेंडे,कमल कनोजिया, अनिकेत सांगळे यांनी केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे करीत आहेत.