एंसबा येथिल नितीन ठाकरे हत्ये प्रकऱणी दोन आरोपीना अटक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– दोन्ही आरोपीचा सखोल तपासा करिता ५ दिवसाचा पीसीआर

कन्हान :- एंसबा येथिल नितीन ठाकरे याच्या हत्ये प्रकरणी पारशिवनी पोलीस निरिक्षक राजेशकुमार थोरात यानी फिर्यादी वडील खुशाल ठाकरे यांचे तक्रारीवरून अप क्र २४१/२०२४ कलम ३०७ अन्वये अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करित तपास करित पारशिवनी पोलीसानी आरोपी जागेश्वर ठाकरे व नागपुर ग्रामिण स्थागुअ शाखा पथकाने आरोपी मंगेश शिवणकर यास ताब्यात घेऊन उशीरा रात्री १२ वाजता अटक करण्यात यश आलेले असुन हत्येतील इतर आरोपी व वापरलेले हत्यार, साहित्याचा शोध घेण्यास न्यायालयातुन दोन्ही आरोपीचा पाच दिवसाचा पीसीआर मिळविला आहे.

मंगळवार (दि.२५) ला नितीन खुशाल ठाकरे वय ३५ वर्ष राह. एंसबा (नांदगाव) हा शेती करित असुन पत्नी दिपाली ला डागा मेमोरियल रूग्णालय नागपुर येथे प्रसुती करिता भर्ती करून दुपारी त्याची आई लता खु़शाल ठाकरे हिला पत्नी जवळ ठेऊन ६ वर्षाची त्याची मुलगी मोही हिला अयोध्यानगर नागपुर येथिल त्याची बहिन वनिता कडे नेऊन ठेवले. ४ वाजता डागा रूग्णालयात येऊन सायंकाळी ४.३० वाजता सासुरवाडी जुनीकामठी ला जावुन घरी परत जातो म्हणुन तेथुन निघाला. जुनीकामठी वरून सायंकाळी ७.३० वाजता एंसबा घराकडे निघाला तो घरी न जाता गोंडेगाव खदान ते डुमरी रोडवर नांदगाव शिवारातील नागोबा मंदीरा सामोर जागेश्वर ठाकरे याच्या धाब्यावर उशिरा रात्री गेला. तेथे दारू पिण्यास मागुन दारू पिण्यातच नितीन व जागेश्वर ठाकरे यांच्यात वाद विकोपा जावुन नितीन च्या डोक्यावर लोखंडी रॉड व हातोडीने मारून जख्मी केल्याने नितिन बेशुध्द झाल्याने तेवढया रात्रीच नितिन ची दुचाकी क्र. एमएच ४९- ए- ७५७१ वर जागेश्वर व मंगेश ने मध्ये बसवुन बखारी ते मेहंदी रस्त्यावरील पुलावर नेऊन टाकले. असता नितीन जिवंत असल्याचे लक्षात आल्याने ढाब्यावरील धारदार चाकुने त्याचा गळा कापुन नितीन ला जिवानिशी ठार करून तेथुन पळ काढुन नांदगाव लगत राख तलावाच्या पाईप लाईन कडे तो चाकु लपवुन धाब्यावर येऊन तेथे पडलेले रक्ताचे पुरावे नष्ट करून कुणाला शंका येऊ नये म्हणुन रात्रभर धाब्या सुरू ठेवला. अशी गुप्त स्वरात चर्चा आहे.

बुधवार (दि.२६) जुन ला सकाळी ७ वाजता मेंहदी येथील युवक डुमरी कडुन घरी जाताना बखारी ते मेंहदी रस्त्यावरील पुलावर दुचाकीसह इसम मृत पडलेला दिसल्याने मेंहदी पोलीस पाटील योगेश कोठेकर हयानी सांगितल्याने त्यानी घटनास्थळी पोहचुन पारशिवनी पोलीस व बखारी माजी सरपंच नरेश ढोणे हयाना माहिती दिल्याने नरेश ढोणे हयानी जावुन ब़घितले तर एंसबा गावचा नितीन ठाकरे याचा गळा कापुन मृत अवस्थेत दिसल्याने त्यानी घटनेची माहिती त्याचे वडिल खुशाल ठाकरे हयाना दिली. तेव्हा पारशिवनी व कन्हान पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून उत्तरिय तपासा करिता मृतदेह मेयो रूग्णालय नागपुर येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदन करून रात्री ८ वाजता आणल्यावर उशिरा रात्री नितिन च्या मृतदेहाचा एंसबा घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला. नितिन च्या मागे वडिल खुशाल ठाकरे, आई लताबाई, ३ विवाहित बहिणी, पत्नी दिपाली, ६ वर्षाची मुलगी मोही ठाकरे आणि जन्मा पुर्वीच वडिलांचे छत्र हरविलेली १ दिवसाची चिमुकली आणि बराच मोठा आप्तपरिवार मागे सोडुन गेल्याने परिसरात हळहळ व्यकत करित दु:खाचे सावट पसरले.

घटनास्थळी पाऱशिवनी पोलीस निरिक्षक राजेशकुमार थोरात, पो उपनि शिवाजी भताने, कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील सह पोलीस कर्मचारी आणि नागपुर ग्रा. स्थागुअ शा़खा पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे प़थकासह पोहचुन अज्ञात आरोपीची शोध मोहिम राबविली. राम टेक उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते हयानी घटनास्थळी भेट दिली. उशिरा रात्री १२ वाजता आरोपी १) जागेश्वर विठ्ठल ठाकरे वय ४५ वर्ष राह. नांदगाव (एंसबा) ह. मु. रामनगर तिवाडे ले-आऊट कन्हान, २) मंगेश पिलाजी शिवणकर वय ३४ वर्ष राह. एंसबा (नांदगाव) याना अप क्र २४१/२०२४ कलम ३०७ भादंवि अन्वये अटक करण्यात पोलीसाना यश आले. गुरूवार (दि.२७) जुन ला पोलीसानी पारशिवनी न्यायालयात हजर केले असता मा. न्यायाधिक्ष साहेबानी गुन्हयातील इतर आरोपी, वापरेलेले हत्यार आणि हत्येचे कारण शोधण्याकरिता दोन्ही आरोपी चा (दि.२) जुलै पर्यंत ५ दिवस पीसीआर दिला आहे.

गुरूवार (दि.२७) ला पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार हयानी घटना स्थळी, पारशिवनी व कन्हान पोलीस स्टेशन ला भेट दिली असता रामटेक पोलीस उपविभागिय अधिकारी रमेश बरकते , कामठी-कन्हान पोलीस उप विभागिय अधिकारी संतोष गायकवाड, पारशिवनी ठाणेदार राजेशकुमार थोरात, कन्हान ठाणेदार उमेश पाटील उपस्थित होते. घटनेचा पारदर्शी बारकाईने तपास करून हत्येचे मुळ कारण शोधुन हत्येतील कुठलाही आरोपी वाचता कामा नाही. असे निर्देश दिले. नितिन ठाकरे हत्या प्रकरणा चा पारशिवनी पोस्टे चे पोउपनि संघमित्रा बांर्बोडे व ङि बी पथक पोउपनि शिवाजी भताने कसुन सखोल तपास करित आहे.

नितीन ठाकरे यांचे नांदगाव येथील धाब्यावर दारू पिऊन जागेश्वर ठाकरे यांचे भांडण झाले आणि मुतक व आरोपी कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत असुन नितीन चा हत्या झालेला मुतदेह मेंहदी शिवारात आढळुन पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने पारशिवनी पोलीस पुढील तपास करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘महाज्योती’तर्फे मोफत MPSC स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

Fri Jun 28 , 2024
• OBC, VJNT व SBC विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी • संकेतस्थळावर अर्ज प्रक्रियेला सुरुवात नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्गातील (एस.बी.सी) विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण राबविण्यात येते. सन 2024-25 या वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) संयुक्त गट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com