नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी
मोहाडी :- तुमसर तालुक्यातील असलपाणी येथे
ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. ट्रॅक्टर उलटून पेटल्याने दोघांचा जळून मृत्यू झाला आहे. सद्या पावसाळा लागला असून शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. तर तुमसर तालुक्यातील आसलपाणी येथिल दिनेश गौपाले हे आपल्या शेतात ट्रॅक्टर घेऊन जात असताना कॅनल वर ट्रॅक्टर उलटला व पेट घेतला या ट्रॅक्टर खाली दिनेश गौपाले वय 30 वर्ष व त्यांचा ड्रायवर अर्जुन रहांगडाले वय 32 वर्ष हे ट्रॅक्टर खाली दबले होते. तितक्यात ट्रॅक्टरने पेट घेतला त्यात दोघांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. तर याची माहिती गोबरवाही पोलिसांना देन्यात आली असुन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.