एकूण डिस्चार्ज58996
एकूण पॉझिटिव्ह60384
क्रियाशील रुग्ण254
आज मृत्यू शून्य
एकूण मृत्यू1134
रिकव्हरी रेट98.00 टक्के
मृत्यू दर01.88
आजच्या टेस्ट1496
एकूण टेस्ट493223
भंडारा, दि. 11 : जिल्ह्यात मंगळवारी 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.11) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 06 आहे. मंगळवारी 1496 व्यक्तींची चाचणी केली असता 68 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 254 सक्रिय रुग्ण आहे.
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58996 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60384 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.00 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 93 हजार 223 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60384 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 33, मोहाडी 06, तुमसर 09, पवनी 02, लाखनी 08, साकोली 03 व लाखांदुर तालुक्यातील 07 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1134 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
नागरिकांना आवाहन
- कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.
- जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत, त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.
- कोविड वर्तणूक नियमावलीचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.