प्रदूषणमुक्त निळया नभासाठी प्रयत्न करा – मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी

-‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एयर फॉर ब्लु स्काइज’ दिवस मनपाने केला साजरा

नागपूर :- मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या प्रसिद्ध अंबाझरी तलावात येथे मानवी आरोग्यसह पर्यावरणाचा अविभाज्य अंग असणारे प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींसाठी गुरुवार (ता.७) रोजी “इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एयर फॉर ब्लु स्काइज” हा दिवस साजरा करण्यात आला. प्रदूषण मुक्त वातावरण आणि निळे आकाश ही सर्वसाठी असून आपण सर्वानी त्याकरिता कार्य केले पाहिजे असे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या वेळी सीएसआयआर- नीरीचे संचालक डॉ अतुल वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, सीएसआयआर- एनएएलचे डॉ कार्तिकेयन, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बनर्जी, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता रविंद्र बूंधाडे, कार्यकारी अभियंता उज्वल लांजेवार, नीरीचे डॉ. अत्या कपले,डॉ महेंद्र पाटील, संगीता गोयल, शारदा कुसनकर, डॉ अंशुमन खर्डेनवीस, मनपाचे  संदीप लोखंडे, चंद्रकांत गभाणे, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी तसेच, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, काजल पिल्ले आदी उपस्थित होते.

शहरातील शुद्ध हवेच्या अनुषंगाने जनजागृती करून, हवेची गुणवत्ता सुधारावी या दृष्टीने सतत मनपा कार्यरत आहे. प्रदूषण मुक्ततेसाठी विविध योजना देखील राबविल्या जातात. माझी वसुंधरा या अभियानंतर्गत शहर स्वच्छतेसाठी कार्य केले जाते. पंचमहाभूतांचे जतन करणे आवश्यक आहे. आपापल्यापरीने प्रदूषण कमी व्हावे याकरिता कार्य करा जसे वाहतूक सिग्नल पळताना लाल सिग्नल असल्यास गाडी बंद करा, कचरा जाळू नका, प्रदूषण कमी करण्यात नागरिकांना योगदान द्या असे आवाहन त्यांनी यावेळेस केले. आजच्या दिनानिमित्त प्रण करा, प्रदूषण कमी करून निळा आकाश दिसेल याचा प्रयत्न करा असे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी म्हटले.

मानव केंद्रित न राहता सृष्टी केंद्रित राहणे आवश्यक आहे, असे सीएसआयआर- नीरीचे निर्देशक डॉ अतुल वैद्य यांनी म्हटले. निसर्ग प्रत्येक सजीवाचा आहे. आपण केवळ मानवी आरोग्याकरिता कार्य न करता सजीव सृष्टीसाठी काम करणे तितकेच आवश्यक आहे. याकरिता कोणाचेही योगदान कमी पडू नये, सर्वांचा सहभाग मिळेल तेव्हाच प्रदूषणावर आपण मात करू शकू असेही ते बोलले.

ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी यांनी इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एयर फॉर ब्लु स्काइज या दिवसाचे महत्व सांगितले. निळे आकाश हे भूतलावर असलेल्या प्रत्येकासाठी आहे आणि सर्वानी आपल्या परीने त्याकरिता आपले योगदान द्यावे असे आवाहन देखील केले. मनपाच्या सहायाने ग्रीन व्हिजील फाऊंडेशन पौर्णिमा दिवस राबवितात. मागील वर्षांपासून दर पौर्णिमेला हा दिवस साजरा केल्यामुळे 2.50 लाख विद्युत यूनिट वाचले आणि कार्बन उत्सर्जन्‍ देखील कमी झाले असेही ते म्हणाले. हे कार्य आपण सर्वानी सुरू ठेवले पाहिजे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Supreme Court Justice Bhushan R Gavai to lead delegation for CMJA conclave at UK

Fri Sep 8 , 2023
Nagpur :- Senior Judge of the Supreme Court Justice Bhushan R Gavai will lead the Indian contingent of judges, jurists and judicial officers for the Commonwealth Magistrates’ and Judges’ Association conference from September 10 at Cardiff, Wales, United Kingdom. The theme for the conference is ‘Open Justice Today’. The purpose of this conference is to draw attention to the issues […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com