हिंगणा विधानसभेत तुतारीला झटका

नागपूर :- जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा) पक्षात वाढी नगरपरिषद व नागपूर जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संतोष नरवडे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्राचार्य सुरेंद्र मोरे,अमित हुसनापुरे व्यापारी आघाडी हे माजी मंत्री रमेश बंग यांचे अतिशय निकटवर्ती असल्याचे समजते यांचा आज प्रवेश झाला.तसेंच वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष अतुल शेंडे त्यांच्यासह अनेक सरपंच ग्रामपंचायत सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा अध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. प्रवेशाचा कार्यक्रम विदर्भ विभागीय ऑफिस गणेश पेठ नागपूर येथे करण्यात आला याप्रसंगी राजा टाकसांडे माजी नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष यांचा पक्षप्रवेश व सत्कार जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी सत्कार केला,याप्रसंगी नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन चव्हाण, हिंगणा विधानसभा अध्यक्ष भागवत खंगार, हिंगणा तालुका अध्यक्ष बिरुसिंग तोमर, नागपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष पांडुरंग गायकी, जिल्हा उपाध्यक्ष विलास मामुलकर, युवती अध्यक्ष अभिलाषा वनमाळी, विद्यार्थी अध्यक्ष नितेश फुलेकर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष निशिकांत चौधरी, माधुरी पालीवाल,वाडी शहराध्यक्ष अमित तायडे व अनेक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश घेण्यात आला या प्रवेशामुळे माजी मंत्री रमेश बंग यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये हलचल निर्माण झालेली आहे अनेक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात करणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Central Railway Organizes Health Check-up Camp for Employees, Retirees, and Families at Borkhedi Station

Thu Jan 2 , 2025
– Health and Wellness Initiative Under the Guidance of DRM Manish Agrawal and CMS Dr. G.S. Manjunath Nagpur :- In an effort to prioritize the health and well-being of its employees, their families, and retired personnel, the Central Railway’s Nagpur Division successfully conducted a health check-up camp at Borkhedi Station. The camp was organized under the guidance of Manish Agrawal, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!