संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांची कारवाई २,५६,१५० रुपयांचा दंड वसुल.
कन्हान : – पारशिवनी तालुक्याती ल कन्हान शहरातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आणि महसुल अधिका-यानी अवैधरित्या रेती वाहतुक करणारा ट्रक पकडुन नऊ ब्रास रेती जप्त करुन २,५६,१५० रुपयां चा दंड वसुल केल्याची माहिती तहसिलदार राजेश भांडारकर हयांनी दिली.
मागील काही दिवसा पासुन पारशिवनी तालु क्यात अवैधरित्या रेती वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमा णात वाढले आहे. उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार राजेश भांडारकर आणि महसु ल विभागाच्या अधिका-यानी अवैधरित्या सुरु असले ल्या रेती वाहतुकीवर अंकुश लावण्या करिता सातत्याने कारवाई करत आहे. त्यामुळे काही प्रमाणात अवैधरि त्या रेती वाहतुक करणाऱ्यांचे दाबे दणाणले आहे.. प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.५) डिसेंबर ला दुपा री १२ वाजता दरम्यान उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आणि महसुल विभाग ग्रस्त पथक कन्हान शहरात अवैधरित्या रेती वाहतुकीवर कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करित होते. दरम्यान गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि, नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर अवैधरित्या रेती वाहतुक सुरु आहे. अश्या मिळालेल्या माहितीवरुन वंदना सवरंगप ते आणि महसुल विभागाच्या अधिका-यानी राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर नाकाबंदी करुन ट्रक क्र. एम एच ४० सीएम ७७४१ ची तपासणी केली असता नऊ ब्रास विना राॅयल्टी रेती वाहतुक करतांना आढळुन आले. वंदना सवरंगपते आणि त्यांच्या पथकांनी घटना स्थळावरुन अवैधरित्या रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक ला नऊ ब्रास रेती सह जप्त करुन २,५६,१५० रुपयां चा दंड वसुल करुन पुढील कारवाई करिता तहसिल दार राजेश भांडारकर यांचा कडे सौपविण्यात आले. तसेच जप्त केलेला ट्रक कन्हान पोलीसांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आला आहे.