संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 6 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती लगतच्या मोकळ्या जागेत ट्रक क्र एम पी जी 2020 च्या मागच्या चाकात आल्याने घडलेल्या अपघातात सदर इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृतक इसमाचे नाव सुनील वय 40 वर्षे रा गोरेगाव गोंदिया असे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर ट्रक चालक हा कन्हान च्या विटभट्ट्यावर कार्यरत असून कन्हान कडे जाण्यासाठी सदर घटनास्थळहून चार कामगार ट्रक ने घेऊन जात असता सदर मृतकसोबत असलेले तीन मजूर हे ट्रक वर बसले तसेच सदर मृतक हा ट्रक क्लिनर च्या जागी बसला .ट्रक सुरू होताच सदर मृतकाचा तोल जाऊन ट्रक खाली पडल्याने सदर मृतक ट्रक च्या मागच्या चाकेत येऊन जागीच मरण पावला.घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पूढील उत्तरिय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.सदर मृतकाची अजूनही ओळख पटली नसून पोलिसानी आरोपी ट्रकचालक परसराम शेंडे रा येसँबा विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
ट्रक अपघातात इसमाचा जागीच मृत्यु
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com