त्रिशला नंदन वीर की जय घोष करीत निघाली भगवान महावीर जन्मोत्सव शोभायात्रा

नागपूर :- जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२२ व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त श्री दिगंबर जैन परवार मंदिर परवारपुरा इतवारी येथून भव्य रथयात्रा निघाली. महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे मुख्य आयोजन दरवर्षी श्री जैन सेवा मंडळाद्वारे केले जाते. श्री जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष शरद मचाले, कार्याध्यक्ष सनत जैन, मंत्री विजय जव्हेरी यांच्या मार्गदर्शनात निघालेल्या रथयात्रेत जैन समाजाचे हजारो महिला पुरुष, मुले सहभागी झाली होती. श्री दिगंबर जैन परवार मंदिराचे अध्यक्ष आनंद मौजीलाल जैन, मंत्री आशीष पंचमलाल जैन यांच्या नेतृत्वात रथयात्रा इतवारी शहीद चौक, टांगा स्टॅण्ड चौक, गांधी पुतळा, केळीबाग रोड, कोतवाली चौक, कल्यानेश्वर मंदिर, झेंडा चौक, चिटनवीसपुरा मार्गे कवीवर्य सुरेश भट सभागृहात पोहोचली. रथयात्रेचे सहयोगी कमल बज, मनीष गिल्लरकर, निकेश जैन, धवन जैन होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

AVALANCHE HITS EAST SIKKIM: RESCUE MISSION BY INDIAN ARMY, STATE DISASTER MANAGEMENT TEAM AND POLICE UNDERWAY

Tue Apr 4 , 2023
SIKKIM :- On 04 Apr 23 at about 11.10 AM, a massive avalanche hit the Gangtok-Natu La JNM Road near MS 15. Approximately 5-6 vehicles along with 20-30 tourists on way to Natu La are feared to have been buried under the snow. Troops of Trishakti Corps, Indian Army and team of BRO Project SWASTIK swung into action immediately and […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com