नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आज महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम यांच्यासह सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली
महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी आणि अभ्यागत उपस्थित होते.