समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई :-  आपल्या लेखनातून समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांनी विविध लेखनप्रकारांतून मराठी साहित्य विश्वात स्वतःचा अमीट ठसा उमटविला. एक कवी, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, संपादक आणि अनुवादक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच विद्यापीठांमध्ये मराठी अभ्यास मंडळांच्या माध्यमातून देखील त्यांनी मराठीची केलेली सेवा मार्गदर्शक अशीच आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले डॉ. कोत्तापल्ले आपल्या भूमिकेवर, विचारांवर कायम ठाम राहिले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्यदेखील अतिशय उल्लेखनीय होते. एक उत्तम मार्गदर्शक, प्रशासक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने आपण गमावले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती शिवरायांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही विधानाचा विपर्यास न करण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन

Thu Dec 1 , 2022
मुंबई :- छत्रपती शिवरायांचे कार्य सगळ्या विश्वात अतुलनीय आहे. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. आज प्रतापगड येथे झालेल्या कार्यक्रमात मी छत्रपती शिवरायां संदर्भात उदाहरण दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्य असून राज्यात त्यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन अत्यंत चांगले काम करण्याचा आपला मानस आहे, असे राज्याचे कौशल्य विकास, पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com