संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 5:- पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे असून प्रत्येक नागरिकांनी एका रोपाचे वृक्षारोपण करून त्याचे झाडात स)संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रेमलता दीदी यांनी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय रनाळा च्या वतीने आयोजित जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या संस्थापिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रेमलता दीदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी रनाळा ग्रामपंचायतच्या सरपंच सुवर्णा साबळे, येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला कारेमोरे ग्रामपंचायत सदस्य अर्चना सपाटे ,सुषमा राखडे, एस नागपुरे , शिलू दीदी ,रेखा दीदी, चंद्रकला दीदी ,कल्पना गायधने, घनश्याम चकोले, राजू काळे, सतीश महेंद्र, हरिहर गायधने उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदी म्हणाल्या प्रदूषणमुक्त वातावरण व पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्षारोपण फार महत्त्वाचे असून प्रत्येक नागरिकांनी एक रोपाचे वृक्षारोपण करून त्याचे झाडात संवर्धन करण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचे आव्हान केले ,सोबतच मानवी जीवनात पर्यावरणाचे फार महत्त्व असल्याचे सांगितले” एक व्यक्ती- एक झाड “या संकल्पनेतून ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात 25 ऑगस्ट पर्यंत 75 रोपाचे वृक्षारोपण करण्यात येणार असून ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या सर्व शाखेत मार्फत 50 लाख रोपांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे सुद्धा प्रेम लतादीदी यांनी सांगितले आहेत . वृक्षारोपण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन सुद्धा केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिलू दीदी यांनी केले संचालन व आभार प्रदर्शन वंदना दीदी यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते